मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बंद पडलेल्या खाणींचा परिसर चक्क बोलू लागला… कसा? जाणून तुम्हही चकीतच व्हाल

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 22, 2023 | 2:22 pm
in राष्ट्रीय
0
Capture 21

 

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आपल्या निष्क्रिय खाणींचे पर्यावरणस्नेही-उद्यानांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया राबवत आहे. ही स्थळे पर्यावरणस्नेही-पर्यटन स्थळे म्हणून लोकप्रिय होत आहेत. ही पर्यावरणस्नेही-उद्याने आणि पर्यटन स्थळे स्थानिक लोकांसाठी उपजीविकेचे साधनही ठरत आहेत. अशी तीस पर्यावरणस्नेही-उद्याने मोठ्या संख्येने पर्यटक आकर्षित करू लागली आहेत. सीआयए खाण क्षेत्रांमध्ये आणखी पर्यावरणस्नेही-उद्याने आणि पर्यावरणस्नेही-पुनरुज्जीवन स्थळांच्या निर्मितीसाठी योजना सुरू आहेत.

गुंजनपार्क, ईसीएल, गोकुळ पर्यावरणस्नेही-सांस्कृतिक उद्यान, बीसीसीएल, केनापारा पर्यावरणस्नेही-पर्यटन स्थळ, अनन्यावाटिका, एसईसीएल, कृष्णशिला पर्यावरणस्नेही-पुनरुज्जीवन स्थळ, मुडवानी पर्यावरणस्नेही-उद्यान, एनसीएल, अनंता मेडिसिनल, एमसीएल, बाळ गंगाधर टिळक पर्यावरणस्नेही-उद्यान, डब्लूसीएल, चंद्रशेखर आझाद पर्यावरणस्नेही-उद्यान, सीसीएल ही कोळसा खाण पर्यटनात आणखी भर देणारी काही लोकप्रिय ठिकाणे आहेत.

“कोणी कल्पनाही केली नव्हती की एक निष्क्रीय खाण एका गजबजलेल्या पर्यटन स्थळात बदलू शकते. आम्ही नौकाविहाराचा आनंद घेत आहोत, नयनरम्य हिरवळीच्या सोबतीने सुंदर पाणवठे आणि तरंगत्या उपाहारगृहात दुपारचे जेवण घेत आहोत,” असे छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यात एसईसीएलने विकसित केलेल्या केनापारा या पर्यावरणस्नेही-पर्यटन स्थळावर एका अभ्यागताने सांगितले. “केनापारा येथे प्रचंड पर्यटन क्षमता आहे आणि आदिवासी लोकांसाठी उत्पन्नाचा एक चांगला स्रोत देखील आहे,” असेही ते म्हणाले.

त्याचप्रमाणे, मध्य प्रदेशातील सिंगरौली येथील जयंतरिया येथे एनसीएलने नुकत्याच विकसित केलेल्या मुडवानी पर्यावरणस्नेही-उद्यानात नजरबंदी करणारी उद्याने उभारली आहेत. तसेच निसर्गरम्य देखावे, कारंजे आहेत. “सिंगरौली सारख्या दुर्गम ठिकाणी, जिथे पाहण्यासारखे फारसे काही नाही, तिथे मुडवानी पर्यावरणस्नेही-उद्यान त्याच्या सुंदर निसर्गामुळे आणि इतर मनोरंजनाच्या सुविधांमुळे पर्यटकांची वर्दळ अनुभवत आहे,” असे एका अभ्यागताने सांगितले.

या व्यतिरिक्त, 2022-23 दरम्यान, सीआयएलने हरित पट्ट्याचा विस्तार 1610 हेक्टरपर्यंत वाढवून 1510 हेक्टर वार्षिक लागवडीचे उद्दिष्ट आधीच ओलांडले आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षात 30 लाख रोपांची लागवड केली आहे. आर्थिक वर्ष 22 पर्यंत गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये, खाण लीज क्षेत्रात 4392 हेक्टर हिरवळीने 2.2 एलटी/वर्षाची कार्बन शोषून घेण्याची क्षमता निर्माण केली आहे.

सीआयएल आपल्या विविध खाणींमध्ये सीड बॉल वृक्षारोपण, ड्रोनद्वारे बियाणांची पेरणी आणि मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण यासारख्या नवीन तंत्रांचा देखील वापर करत आहे. उत्खनन केलेले क्षेत्र, अधिक भरणी केलेले क्षेत्र इत्यादि सक्रीय खाण क्षेत्रांमधून विलग झाल्यानंतर लगेचच समावेशासाठी त्यावर पुन्हा दावा केला जातो. जैविक पुनरुत्थानासाठी विविध प्रजातींची निवड, केंद्र आणि राज्य-अनुदानित तज्ञ संस्थाशी सल्लामसलत करून केली जाते. रिमोट सेन्सिंगद्वारे जमीन पुनर्संचयित आणि जीर्णोद्धाराचे निरीक्षण केले जात आहे आणि सध्या सुमारे 33% क्षेत्र हरित कवचाखाली आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1628238603976581120?s=20

Transform 30 Hostile Mining Places Barren Land Tourism Spot

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तुर्कीप्रमाणेच उत्तराखंडमध्ये येऊ शकतो भूकंप; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा, देवभूमीवर पुन्हा संकटावे सावट!

Next Post

१२ वीच्या परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे १० मोबाईल चोरट्यांनी केले लंपास

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण चार निर्णय

सप्टेंबर 9, 2025
IMG.02
संमिश्र वार्ता

रावेरचे शरद पवार गटाचे माजी आमदार यांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

सप्टेंबर 9, 2025
Screenshot 20250909 123855 WhatsApp
संमिश्र वार्ता

राहुड घाटात गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरु…वाहतुकीची कोंडी

सप्टेंबर 9, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
संमिश्र वार्ता

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू…आज या संघा दरम्यान सामना

सप्टेंबर 9, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

मी पुराव्याशिवाय बोलत नाही, पण, हे खरं आहे काय? रोहित पवार यांचे मंत्री बावनकुळे यांना प्रश्न

सप्टेंबर 9, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळ सरकार झुकले…सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचा राजीनामा

सप्टेंबर 9, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी…बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सप्टेंबर 9, 2025
mou1 1024x496 1
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

सप्टेंबर 9, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

१२ वीच्या परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे १० मोबाईल चोरट्यांनी केले लंपास

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011