इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केरळमधील कोझीकोडे येऊन अजब प्यार की गजब कहानी समोर येत आहे. येथे तृतीयपंथी दाम्पत्य तीन वर्षांपासून एकत्र नांदत आहे. त्यांच्याकडे लवकरच पाळणा हलणार असल्याचीही गोड बातमी आहे. विशेष म्हणजे ट्रान्स मॅन प्रेग्नंट असून मार्च महिन्यात बाळ जन्माला येणार आहे. यामुळे हे जोडपे सध्या भारीच खूश असून त्यांची प्रेमकहानी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.
साहद (२३) आणि झिया (२१) हे तृतीयपंथीय कपल तीन वर्षांपासून एकत्र राहते. त्यांनी सोशल मीडियावरून त्यांनी खासगी आयुष्याबाबतची माहिती शेअर केली आहे. त्यानुसार लिंग परिवर्तनासाठी या दोघांनीही हार्मोन थेरेपी सुरू केली आहे. यासाठी साहदची स्तनही काढण्यात आले. बाळाला जन्म दिल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारेच साहदचा जीवनप्रवास सुरु राहील. ट्रान्स मॅन आणि ट्रान्स वुमन अशाच प्रकारचे जीवन आम्ही पुढील आयुष्यात जगणार असे त्यांचे म्हणणे आहे. मी माझी हार्मोन ट्रिटमेंट सुरु ठेवत आहे. प्रसृतीनंतर सहा महिन्यांनी किंवा एका वर्षानंतर सहाद ट्रान्स मॅन होण्यासाठीची ट्रिटमेंट पुन्हा सुरु करेल, असेही झियाने म्हटले आहे.
विचारांती निर्णय
कोझीकोडे येथे क्लासिकल डान्स टिचर असलेल्या झियाने त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल बोलताना म्हटलं की, आम्ही तीन वर्षांपासून एकत्र राहतो. इतर तृतीयपंथीयांपेक्षा आमचं जीवन वेगळं असावे, असे वाटते. तृतीयपंथीयांना काही ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. काही कुटुंबात तृतीयपंथीयांना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते. जगात आमचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी आम्ही एका बाळाला जन्म द्यायचे ठरवले. खूप विचारविनिमय झाल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला.
सरकारी रुग्णालयात उपचार
कोझीकोडे येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी या दाम्पत्याला मदत केली आहे. पुढील महिन्यात साहदची प्रसुती याच रुग्णालयात करण्यात येणार आहे. साहदने स्तन काढल्यामुळे बाळाला रुग्णालयातील ब्रेस्ट मिल्क बॅंकेतून दुधाची उपलब्धता करुन दिली जाणार आहे.
https://twitter.com/DeshmukhHarish9/status/1621794901997531137?s=20&t=RZw1sf6GfBGhk475Fev_-Q
Trans Man Pregnant Kerala Couple Viral News