त्र्यंबकेश्वर – इस्लामपूर येथे जाहीर सभेमध्ये हिंदु समाजाच्या परंपरा, मंत्रोच्चार आदि बाबत अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावणारे सामाजिक द्वेष पसरवल्या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांची आमदारकी रद्द करा असे निवेदन भाजपतर्फे तहसिलदारांना देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्र्याना तहसिलदारांनी पाठवाने असे आवाहन करण्यात आले हिंदु समाजाच्या चालीरीती व ब्राह्मण पुरोहितांचे मंत्रोच्चार या बाबतीत टिंगल टवाळी करून चुकीचे मंत्रोच्चार केले व विवाहातील कन्यादान संदर्भात चुकीची टिप्पणी करून समस्त हिंदु समाज व पुरोहितांच्या भावना दुखावल्याचे या निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे व्यासपीठावर उपस्थित असतांना आमदार अमोल मिटकरी हिंदुसमाज व पुरोहितां बाबत अतिशय तुच्छ भाषेत टिंगल टवाळी करत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील,मंत्री धनंजय मुंडे हासुन त्यांना प्रोत्साहन देत होते. पवित्र अशा हिंदु समाजातील सर्व जातीमधे ‘कन्यादान” विधी केला जातो. यामधे कुठेही ‘मम भार्या समर्पयामी” असा उल्लेख नाही. परंतु अतिशय अश्लाघ्य भाषेत या सर्व विधीचे वर्णन करून समस्त महिला वर्गाला देखील अपमानित करण्याच काम आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. या सर्व घटनेमुळे आमदार अमोल मिटकरी हे सामाजिक सलोखा बिघडवत असून आमदारकीची घेतलेल्या शपथेचे उल्लंघन करत आहे. तसेच भारतीय राज्यघटनेचे पालन न करता अवमान करत आहे. तरी आमदार अमोल मिटकरी यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वरच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजप नेते अॅड.श्रीकांत गायधनी, पुरोहित संघ अध्यक्ष प्रशांत गायधनी, भाजपा शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, तालुकाध्यक्ष विष्णु दोबाडे यांनी निषेध नोंदवून आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी भाजपा पदाधिकारी हर्षल भालेराव, बाळासाहेब कळमकर, मिलिंद धारणे, मनोज थेटे, चंद्रकांत प्रभुणे, भावेश शिखरे, कौशिक अकोलकर, प्रविण पाटिल, युवा मोर्चाचे विराज मुळे, संकेत टोके, प्रसाद गंगापुत्र, निलेश पवार, भुषण दाणी, आंबादास फोपळे आदी उपस्थित होते.