त्र्यंबकेश्वर – श्री गणराया पाठोपाठ घराघरात आज जेष्ठा, कनिष्ठा गौरींच आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाच वातावरण निर्माण झाले आहे. सोनपावलांनी आलेल्या गौरींच्या स्वागतासाठी घरोघर कामांची लगबग सुरु होती. घरातील पुरुष मंडळींनी सजावटीसाठी बरीच मेहनत घेतली. गणराया पाठोपाठ गौरींचं आगमन झाल्याने घरोघर चैतन्याचं वातावरण पसरले होते. प्रत्येक ठिकाणी गौरींसाठी उत्कृष्ठ सजावट करण्यात आलेली होती. माहेरी आलेल्या गौरींच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ तयार करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरु आहे. घराघरात खमंग वास दरवळत आहे. घरांसमोर विविधरंगी रांगोळ्या व गौरींचे सोनपावलं लक्ष वेधुन घेत आहे. गौरी गणपतीच्या आगमनाने घरातील बच्चे कंपनीमध्ये उत्साह संचारला होता.
नाशिक मधील नंदकुमार धारणे यांच्या त्र्यंबकराज निवासस्थानी गौरींचं पारंपारीक रित्या मोठ्या थाटात आगमन झाले. वसुधा, निलीमा, राधिका, आकांक्षा आदी सुवाशिनींनी मोठ्या भक्तीभावाने गौरींचे स्वागत व स्थापना केली. अभिजित, आशिष, आदित्य यांनी उत्कृष्ठ सजावट केली. परी, काव्या आणी आद्य या बालगोपाळांनी सर्व कामांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला. त्र्यंबकेश्वर येथील वेदमुर्ती महेंद्र तथा बाळासाहेब धारणे यांच्या नाथकृपा निवासस्थानी गौरींची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. स्वाती, मयुरी, निखिल, हर्षदा तसेच हिरण्या यांनी मोठ्या उत्साहात गौरीचे स्वागत केले. आज गौरींचं आगमन झाल्यावर उद्या पूजन तर तिसर्या दिवशी म्हणजे मंगळवारी मुळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन होईल.