त्र्यंबकेश्वर – महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सुवर्णपेढी असलेले पुणे येथील पु.ना. गाडगीळ अँड सन्स यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांच्या वतीने श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील नंदी महाराजास सुमारे ९ किलो चांदीचा पाट देव-दीपावलीच्या (त्रिपुरारी पौर्णिमेच्या) शुभ मुहूर्तावर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानला भेट देण्यात आला. मंदिराचे निर्मिती पासून दगडी चबुतऱ्यावर असणारी नंदी महाराजांची अतिशय सुंदर व सुबक मूर्तीस चांदीचा पाट अर्पण केल्याने नंदी महाराज हे अतिशय आकर्षक दिसत आहे.
सुंदर नक्षीकाम केलेल्या सदर पाटावर चार कोपऱ्यात बिल्वपत्र, स्वस्तिक, नाग, त्रिशूळ ई. कोरलेले असून, पाटावर चौकोनात कोरलेल्या फुलांच्या नक्षीकामाने नंदी मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे. पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक व त्यांच्या सौभाग्यवती सुनिता मोडक यांचे शुभहस्ते सदर पाटाचे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानचे कोठी कार्यालयात विधिवत पूजन करून नंदी मंदिरात अर्पण करण्यात आला.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने चेअरमन विकास कुलकर्णी, तसेच विश्वस्त प्रशांत गायधनी,संतोष कदम, भूषण अडसरे यांनी सदर चांदीच्या पाटाचा स्वीकार केला. ट्रस्टचे चेअरमन कुलकर्णी यांनी मोडक यांचे सदर भेटीबद्धल आभार व्यक्त केले आहेत. देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोडक यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांचे नाशिक येथील शाखेचे राहुल शेवकरी, देवस्थानचे प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, अमित टोकेकर, अंकुश जाजडा, अमित माचवे, रशवी जाधव, योगेश सोलंकी, विजय गंगापुत्र, व इतर कर्मचारी उपस्थित होते.