त्र्यंबकेश्वर – नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवसांपासुन महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे प्रार्थना स्थळे उघडणार असून त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदीर याच दिवसापासुन सकाळी ७ ते रात्री ८ वाजे पर्यंत उघडे राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर शासन निर्णया नुसार ७ ऑक्टोबर पासून सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली होत आहेत. त्यामुळे सदर कार्याच्या नियोजनासाठी काल श्रीत्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन तथा जिल्हा सत्र न्यायाधीश विकास कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, नाशिक जिल्हा न्यायालयाचे वरिष्ठ न्यायालयीन व्यवस्थापक अशोक दारके, तहसीलदार दीपक गिरासे, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष समीर पाटणकर व ट्रस्टचे विश्वस्त दिलीप तुंगार, सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी, तृप्ती धारणे, पंकज भुतडा, संतोष कदम, भूषण अडसरे तसेच पुरोहित महासंघाचे कार्याध्यक्ष मनोज थेटे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शासन निर्देशित नियमावलीच्या अनुषंगाने वाहन पार्किंग व्यवस्था, दर्शन व्यवस्था आदींचे नियोजन करण्यात आले. यावेळी शासनाने अर्थात देवस्थानने जी नियमावली जारी करण्यात आली आहे तिचे वाचन करण्यात आले. एकुण २६ नियम जारी करण्यात आले असुन त्यात प्रामुख्याने प्रत्येक भाविकांना नाक तोंड झालेले असेल असे मास्क लावणे अनिवार्य आहे .दहा वर्षांच्या आतील मुलांना मंदिरात नेण्याचा मोह धरु नये. त्यांना प्रवेश मिळणार नाही. तसेच ६५ वर्षे वयाच्या पुढील भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. व गरोदर महिलांनी देखील दर्शनाचा आग्रह धरु नये.याशिवाय ज्याचे दोन डोस पुर्ण झाले आहेत. किंवा ज्याांनी डोस घेतले नसतील त्यांनी ७२ तासातील आरटीपीसीआर तपासणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवून दर्शनासाठी सोडण्यात येईल. भाविकांनी आपली पादत्राणे शक्यतो आपल्या वाहनातच ठेवावीत. जेथे सॅनिटायझर ठेवलेले असेल तेथे सॅनिटायझरचा वापर करावा. शक्य तो रेलींग पाईप आदी वस्तु असेल तर त्यांना हात लाऊ नये. निशुल्क धर्मदर्शन मंदिराच्या पुर्व दरवाजाला असलेल्या मंडपात लाईन लाउन दर्शन घ्यावे. तर देणगी दर्शन मंदिराच्या उत्तरेकडील महादरवाजातुन सोडण्यात येईल. स्थानिक भाविकांना सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत व सायंकाळी ५.३० ते ७.३० पर्यंत दर्शन घेता येईल. मात्र सोबत आधार कार्ड असावे. स्थानिक गावक-यांच्या लोकांबरोबर पाहुणे अथवा अनोळखी व्यक्तीस घेउन जाता येणार नाही. जे भाविक कन्टेन्मेन्ट झोनमध्ये वास्तव्य करत असतील त्यांना प्रवेश राहणार नाही. शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे प्रत्येक भाविकांना पालन करावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.