त्र्यंबकेश्वर – सर्वांच्या लाडक्या गणरायाचं आज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मागील वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते तसेच कोरोनाबाबद नागरीक अनभिज्ञ असल्याने कोरोनाच्या दहशतीखाली होते. यावर्षी सार्वजनिक मंडळांसाठी काही निर्बंध आखुन दिलेले आहे. मात्र घरगुती गणेशोत्सव उत्साहात संपन्न होत आहे. त्यामुळेच आठवड्यापासुन घरोघर तसेच सार्वजनिक मंडळांच्या वतीने विघ्नहर्त्याच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरु होती. बाजारामध्ये गणेश मुर्ती व सजावटीच्या सामानाचे स्टॅाल लागले होते. बर्याच नागरीकांनी अगोदरच स्टॅालवर जाउन आपल्या आवडीच्या गणेश मुर्ती बुक करुन ठेवल्या होत्या. शाडुमातीच्या गणेश मुर्तींना जास्त मागणी होती.
गणेश चतुर्थीच्या पुर्व संध्येला तर काही नागरीकांनी आज सकाळी घंटानाद व बाप्पांचा जयघोष करीत गणेश मुर्ती घरी घेउन आले. दरवाजा बाहेर बाप्पांना औक्षण करण्यात आले. त्यानंतर भक्तीपुर्ण वातावरणात आणी वेदमंत्राच्या जयघोषात श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. श्रीगणेशाच्या आगमनाने वातावरणात चैतन्य भारावुन गेले आहे . श्रीगणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करतांना २१ पत्रींची आवश्यकता असते. पण या सर्व पत्री बाजारात मिळत नाही. हि अडचण लक्षात घेऊन श्रीमंत पेशव्यांचे सरदार ज्यांनी भगवान त्र्यंबकेश्वराच्या चरणी रथ अर्पण केला ते सरदार विंचुरकरांचे येथील तिर्थपुरोहित वेदमुर्ती रविंद्र आग्निहोत्री यांनी येथील सर्व ब्रह्मवृंदांना पुजे मध्ये सांगितलेली २१ प्रकारची पत्री मोफत उपलब्ध करून दिली. ही पत्री घेण्यासाठी समस्त ब्रह्मवृंदांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. मागील वर्षापासुन ते हा उपक्रम राबवित आहे .