त्र्यंबकेश्वर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे सुरू करावे या मागणी करिता भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने श्रावणातील पहिल्या सोमवारी आद्य ज्योर्तिलींग त्र्यंबकेश्वर येथे आचार्य तुषार भोसले व त्र्यंबकेश्वर येथील साधुसंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. देशभरातील सर्व धार्मिक स्थळं नियमानुसार सुरू करण्यात आलेले असतांना केवळ महाराष्ट्रातीलच मंदिरे बंद आहेत त्यामुळे तिर्थक्षेत्रावरील मंदिरावर अवलंबुन असलेले सर्व व्यावसायिकांसह अवलंबुन असलेल्या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे खुली करावी अशी मागणी यावेळी आचार्य तुषार भोसले यांनी केली. हिंदु धर्मातील पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरवात झाली असुन महादेवाची उपासना पुजा करण्याऐवजी आज मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने त्वरित मंदिरे सुरू करावे व सर्वांना दिलासा द्यावा अशी मागणी महंत शंकरानंद सरस्वती व साधु महंतानी केली.
आंदोलनाच्या प्रारंभी शिवलिंगावर अभिषेक पुजन व आरती करण्यात आली. पुजेचे पौरोहित्य वेदमुर्ती बाळासाहेब कळमकर यांनी केले. भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह नागरीकांनी आंदोलनात सहभाग घेत घोषणाबाजी करुन परीसर दणाणून सोडला. ऐकीकडे मॅाल, दारू दुकाने, बसेस सर्व सुरू असतांना धार्मिक स्थळांनाच वेगळा न्याय का ? किमान लसीकरण झालेल्या भाविक भक्तांना मंदिरात प्रवेश मिळावा व मंदिर खुली करून त्यावर अवलंबून असलेल्या घटकांची उपजीविका भागविण्यासाठी सर्वांना दिलासा द्यावा अशी मागणी त्र्यंबकेश्वर भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. आंदोलनाचे सर्व नियोजन तालुकाध्यक्ष विष्णु दोबाडे व शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी केले होते. याप्रसंगी आखाडा परिषदेचे शंकरानंद सरस्वती, रामानंद महाराज, प्रकाश महाराज जवंजाळ, साधु-महंत, पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, कमलेश जोशी, नगरसेविका त्रिवेणी तुंगार, सचिन शुक्ल, हर्षल भालेराव, प्रविण पाटिल, विराज मुळे, रामचंद्र गुंड, बाळासाहेब अडसरे, धनंजय देशमुख, भाऊसाहेब झोंबाड, संकेत टोके, अवधुत धामोडे, राहुल खत्री, संजय कुलकर्णी, राजेश शर्मा, रमेश दोंदे, संगिता मुळे, सुवर्णा वाडेकर, वैष्णवी वाडेकर, सुयोग शिखरे, मयुर वाडेकर, भावेश शिखरे, गणेश मोरे, विजु पुराणिक, अमोल सूर्यवंशी, राकेश रहाणे, प्रितेश सारडा, गोपाळ झोंबाड, समीर काळे आदि पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.