त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी त्रिवेणी तुंगार- सोनवणे यांची आज निवड करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. रोटेशन पध्दतीने उपनगराध्यक्षा शिल्पा रामायणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, नगरसेवक, नगरसेविका, आदींसह समर्थक उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका त्रिवेणी तुंगार यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची निवड करण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणुन नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी काम बघितले तर मुख्याधिकारी संजय जाधव आणी संजय मिसर यांनी निवडणुक कार्य संपन्न केले. निवड जाहिर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडुन त्यांच्या निवडीचे स्वागत केले. यानंतर ढोलताशांच्या गजरात गावातुन मिरवणुक काढण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पानाफुलांनी सजविलेल्या जिपवर नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा विराजमान झाल्या होत्या.
यावेळी निशिकांत फडके, भगवंतराव तथा बाळासाहेब पाठक, दिलीप जोशी, अॅड. श्रीकांत गायधनी, तालुकाध्यक्ष विष्णु दोबाडे, शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, युवराज कोठुळे, तेजस ढेरगे, नगरसेवक कैलास चोथे, समीर पाटणकर, सागर उजे, दीपक लोणारी, शिल्पा रामायणे, अनिता बागूल, अशोक घागरे, संगिता भांगरे, भारती बदादे, कैलास भुतडा, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र सोनवणे यांचेसह मित्रपरिवार, नातेवाईक, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर पर्यटन व धार्मिक नगरी असून याठिकाणी येणाऱ्या भाविकांना योग्य त्या सुविधा देणे हे त्र्यंबक नगर परिषदेच्या प्रथम कर्तव्य असून त्यादृष्टीने त्रंबकेश्वर नगरीत आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा व दिवाबत्ती सुविधा देऊन त्र्यंबकेश्वरमधील नागरिकांना जास्तीत जास्त व्यावसायिकांना व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीलव प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे मनोगत नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी व्यक्त केले.