त्र्यंबकेश्वर – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ महाराजांची पौष वारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. २५ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान होणारी ही पौष वारी यात्रा रद्द केली आहे. आषाढी वारीनंतर पौष वारीचं वारकऱ्यांसाठी मोठे महत्त्व असून या यात्रेसाठी दरवर्षी राज्यभरातून येतात हजारो वारकरी येत असतात. या यात्रेत तब्बल ५०० हून अधिक दिंड्या वारीत सहभागी होत असतात. त्यामुळे ही गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पण संत निवृत्तीनाथ मंदिरात नित्य पूजा करण्यास परवानगी दिली आहे. वारी काळात कोरोना नियमांचं पालन करून केवळ मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत करता येणार पूजाविधी होणार असल्याची माहिती संत निवृत्ती महाराज संस्थानचे प्रशासक अॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी ही माहिती दिली आहे.