त्र्यंबकेश्वर – दुचाकीला डुक्कर आडवे गेल्याने दुचाकी स्लीप झाली. झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला तर पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली असून तिला अधिक उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात त्र्यंबकेश्वर येथे घडला. याबाबlत सविस्तर हकिकत अशी की, शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास श्रीसंत गजानन महाराज चौकातुन दुचाकी जव्हार रोडने जात होती. जुना जव्हार फाटा जवळ सिनिअर कॅालेजच्या पाठीमागील बाजुस दुचाकीस डुक्कर आडवे आले. त्यामुळे दुचाकी क्रमांक MH 15 ER 1734 ही रस्त्यावर स्लीप झाली. दुचाकी चालक पंकज भिमराव वाघ, वय ३३ वर्षे हा दुभाजकावर आदळल्याने त्याचे डोक्यास मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. पाठीमागे बसलेली महिला शितल भुषण ठाकुर वय २८ वर्ष या गंभीर जखमी झाल्या. पो. ना. रुपेश मुळाणे, पो. शि. श्रावण साळवे यांनी त्यांना तात्काळ १०८ रुग्णवाहिकेद्वारे त्र्यंबकच्या उप जिल्हा रुग्णालयात हलविले. सदर महिलेवर डॅा. विशाल रगडे यांनी प्रथमोपचार करुन अधिक उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात पाठवले. पो. ना. मेघराज जाधव, रुपेश मुळाणे, श्रावण साळवे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जखमी महिलेने उत्तम नगर, नाशिक असा पत्ता सांगितला. तर मयत पंकज वाघ याच्या आधारकार्ड वर नेताजी चौक, गवळी चाळ, चाळीसगाव असा पत्ता आहे. पो. नि. संदिप रणदिवे व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहे.