मुंबई – सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये खूप मोठी स्पर्धा सुरू आहे. सरकारी कंपनी असो की खासगी कंपनी यामध्ये ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखण्यात येत आहेत. भारती एअरटेलने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले असून जून महिन्यात 38,12,530 नवीन ग्राहक एअरटेल कंपनीशी जोडले गेले आहेत.
यंदा मे महिन्यात 46.13 लाख ग्राहकांनी एअरटेल सोडले होते, मात्र आता जून 2021 मध्ये ग्राहकांनी जोरदार पुनरागमन केले असून त्यात 38 लाख नवीन वापरकर्ते जोडले आहेत. तथापि, जास्तीत जास्त 54,66,556 ग्राहक रिलायन्स जिओशी जोडलेले आहेत. त्यामुळे टेलीकॉम क्षेत्रात सहाजिकच भारतात रिलायन्स जिओचे वर्चस्व कायम आहे. मे 2021 मध्ये 34.54 लाख नवीन वापरकर्ते ग्राहक रिलायन्स जिओशी संबंधित होते. याउलट वोडाफोन-आयडियाची स्थिती सुधारली नाही, असे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या जून 2021 च्या अहवालानुसार दिसून येत आहे.
ट्रायच्या अहवालानुसार, पण वोडाफोन-आयडियाची नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा निराशा झाली आहे. मे माहिन्याप्रमाणेच जून 2021 मध्ये सुमारे 42,89,519 ग्राहकांनी व्होडाफोन-आयडियाची सेवा सोडली आहे. अशा प्रकारे, व्होडाफोन आयडियाचा एकूण वापरकर्ता ग्राहक वर्ग 273 दशलक्षांवर आला आहे. त्याचबरोबर रिलायन्स जिओचा वापरकर्ता आधार 43.6 कोटी झाला आहे. अशाप्रकारे, युजर बेसच्या बाबतीत जिओ भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओमध्ये 1.87 लाख नवीन ग्राहक जोडले गेले आहेत. त्याच वेळी, एअरटेलचा एकूण वापरकर्ता संख्या 352 दशलक्ष झाली आहे, त्यामुळे जूनमध्ये वायरलेस ग्राहकांची संख्या 38.1 लाखांनी वाढली आहे. भारतातील एकूण टेलिफोन ग्राहकांची संख्या 1202 दशलक्षांवर पोहोचली आहे.
भारतात मेच्या तुलनेत जूनमध्ये ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या वाढून 792 दशलक्ष झाली आहे. यामध्ये सुमारे 1.60 टक्के वाढ झाली आहे. भारतातील टॉप -5 ब्रॉडबँड सेवा पुरवठादारांचा बाजारातील 98.7 टक्के हिस्सा आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया, बीएसएनएल आणि अट्रिया कन्व्हर्जन्स हे प्रमुख टेलीकॉम सेवा कंपन्या आहेत. त्यात
1 )रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड – 439.91 दशलक्ष,
2 ) भारती एअरटेल – 197.10 दशलक्ष,
3 ) व्होडाफोन आयडिया – 121.42 दशलक्ष,
4 ) बीएसएनएल – 22.69 दशलक्ष,
5 ) एट्रिया कन्वर्जन्स – 1.91 दशलक्ष,
अशी आकडेवारी आहे.