नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर वाहनचालक असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, नजिकच्या काळात अतिशय कठोर नियमांचे पालन तुम्हाला करावे लागू शकते. त्यासाठी केंद्र सरकारने कार्यवाही सुरू केली आहे. ज्येष्ठ उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार रस्ते अपघात आणि नियमांबाबत अतिशय गंभीर झाले आहे.
कार आणि टॅक्सींमध्ये अधिक सुरक्षा व्यवस्था लागू करण्याबाबत ऑटो कंपन्यांकडून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ५ ऑक्टोबरपर्यंत सूचना मागवल्या आहेत. नव्या प्रणालीमध्ये सीट बेल्ट मागे न लावल्यास आवाजासोबत बीपही ऐकू येईल. कारमध्ये अलार्मचे दोन स्तर असतील. डॅश बोर्डवरील सीट बेल्ट लाइट पहिल्या इंजिन सुरू झाल्यावर फ्लॅश होईल. कार दुसऱ्या स्तरावर जात असताना, चार सेकंद किंवा त्याहून अधिक काळ बीप ऐकू येईल.
उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने कारमध्ये अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, मागील सीट बेल्ट न लावल्यास, वाहनाचा वेग जास्त असल्यास आणि पार्किंग दरम्यान अलार्म वाजविला जाईल. कारमध्ये मागील सीट बेल्ट घातल्यास १ हजार रुपये दंड आकारला जातो.
याशिवाय मोटारसायकलींमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणासाठी दिल्ली वाहतूक पोलिसांकडून चालान जारी करण्यात येत आहेत. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी प्रेशर हॉर्न आणि मॉडिफाइड सायलेन्सरसाठी चलन जारी केले आहे. जर तुम्ही तुमच्या मोटारसायकलमध्ये मॉडिफाइड सायलेन्सर लावला असेल तर तो ताबडतोब काढून टाका आणि वाहतूक नियमांचे पालन करा.
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर, वाहनाच्या मागील सीटवर बेल्ट न लावणाऱ्यांविरोधात दिल्ली पोलीस कडक झाले आहेत. नियम न पाळणाऱ्यांचे १००० रुपयांचे चलन कापले जात आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला वाहतूक नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे.
Traffic Rules Vehicle Driving Union Government
Road Accident Safety
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD