पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – अनेकदा आपण पत्नी आणि मुलासोबत मोटारसायकलवरून प्रवास करत असाल, अशावेळी तुमचे ट्रॅफिक चलन कापले जाऊ शकते. त्यामुळे या पुढे काळजी घ्या. बहुतांश पालक अनेकदा आपल्या पत्नी व मुलासोबत बसून स्कूटर आणि बाइकवर जाताना दिसतात. मात्र आता नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाची ट्रीपल सीट तथा तिसरा प्रवासी म्हणून गणना केली जाईल. त्यामुळे अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या मुल आणि पत्नीसह दुचाकीवर बसणार असाल आणि मुलाचे वय चार वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुमचे चलन कापले जाऊ शकते.
मोटार वाहन कायद्याच्या कलम 194A नुसार, या नियमाचे उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचे चलन कापले जाऊ शकते. इतकेच नव्हे तर या प्रवासात फक्त मुलाचा समावेश केल्यानंतरही तुमच्या मोटरसायकल किंवा स्कूटरवरून फक्त 2 लोक जात आहेत आणि तरीही तुमचे चलन कापले जाऊ शकते. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, जर मुलाचे वय चार वर्षांपेक्षा जास्त असेल आणि मुलाने हेल्मेट घातले नसेल, तर तुमचे 1000 रुपयांचे चलन कापले जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला वाहतूक नियमांचे पालन करण्याचा आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला जातो.
याशिवाय लायसन्सशिवाय गाडी चालवताना पकडले गेल्यास 5000 रुपये दंड किंवा तुरुंगात जावे लागू शकते. अशा परिस्थितीमध्ये हे चलन टाळण्यासाठी, वाहन चालवताना नेहमी संबंधित कागदपत्रे सोबत ठेवा. तसेच मोटारसायकलवर तुमच्या मागे बसलेला तुमचा हेल्मट न घातलेला निष्काळजी मित्र बसलेला असेल तर तुम्हाला 1000 रुपये दंड आणि हेल्मेट न वापरणार्यांना 1000 रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो, तसेच तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स देखील मोटार वाहन कायद्याच्या कलम 194C अंतर्गत तीन महिन्यांसाठी अपात्र ठरू शकते.