अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
या धावपळीच्या जीवनात आपण गाडी चालवताना अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. कार चालवताना सीट बेल्ट लावायला विसरणे, दुचाकी चालवताना हेल्मेट घालायला विसरणे, अशा चुकांचा त्यात समावेश असतो. हे विसरणेदेखील नियमाच्या विरोधात आहेत. जर वाहनाचा लाईट किंवा हॉर्न नीट वाजत नसेल तर तोही ड्रायव्हिंगचा दोष मानला जातो. पण हे सगळं असलं तरी ट्रॅफिक कॉन्स्टेबल तुमचे चलन कट करु शकत नाही.
जर ट्रॅफिक पोलिस तुमच्या गाडीच्या चाव्या काढत असतील तर तेही नियमांच्या विरोधात आहे. तुम्हाला अटक करण्याचा किंवा वाहन जप्त करण्याचा अधिकारही ट्रॅफिक पोलिसांनाही. मात्र, अनेकांना याची माहिती नसते. वाहतूक पोलिसांना पाहून लोकं घाबरतात. मात्र अशा प्रसंगी आपल्या हक्कांची जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे.
भारतीय मोटार वाहन कायदा १९३२ अंतर्गत, केवळ एएसआय स्तरावरील अधिकारीच रहदारीच्या उल्लंघनासाठी तुमचे चलन कापू शकतो. एएसआय, एसआय, इन्स्पेक्टर यांना जागा निश्चित करण्याचे अधिकार आहेत. त्यांना मदत करण्यासाठी वाहतूक हवालदार असतात. कुणाच्याही गाडीच्या चाव्या काढण्याचा अधिकार त्यांना नाही. अनेकदा ट्रॅफिक पोलिस गाडीच्या टायरची हवाही काढत असल्याचे समोर आले आहे. पण असे कृत्यही ते करु शकत नही. ते तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलू शकत नाहीत किंवा वाईट वागू शकत नाहीत. ट्रॅफिक पोलीस तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील तर तुम्ही त्यांच्यावरही कारवाई करू शकता.
या गोष्टी लक्षात ठेवा
– तुमचे चलन कापण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे चलान बुक किंवा ई-चलान मशीन असणे आवश्यक आहे. जर या दोघांपैकी कोणीही त्यांच्यासोबत नसेल तर तुमचे चलन कापले जाऊ शकत नाही.
– वाहतूक पोलिसांचाही गणवेश असणे आवश्यक आहे. युनिफॉर्मवर बकल नंबर आणि त्यांचे नाव असावे. गणवेश नसताना पोलिस कर्मचाऱ्याला त्याचे ओळखपत्र दाखवण्यास सांगितले जाऊ शकते.
– वाहतूक पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल तुम्हाला फक्त १०० रुपये दंड करू शकतात. यापेक्षा जास्त दंड फक्त वाहतूक अधिकारी म्हणजेच एएसआय किंवा एसआय करू शकतात.
– जर ट्रॅफिक पोलिसाला तुमच्या गाडीची चावी मिळाली तर तुम्ही त्या घटनेचा व्हिडिओ बनवा. हा व्हिडीओ तुम्ही त्या भागातील पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्याला दाखवून तक्रार करू शकता.
– वाहन चालवताना तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची मूळ प्रत असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, वाहन नोंदणी आणि विम्याची छायाप्रत देखील चालू शकते.
– जागेवर पैसे नसल्यास दंड नंतर भरू शकता. अशा परिस्थितीत कोर्टाकडून चलान जारी केले जाते. ते कोर्टात जाऊनच भरावे लागते. या दरम्यान, वाहतूक अधिकारी तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्याकडे ठेवू शकतात.