पंडित दिनेश पंत
भारतीय संस्कृतीमध्ये तुलसी विवाह अर्थात तुळशीच्या लग्नाची मोठी परंपरा आहे. तुळशीचे लग्न म्हणजे भगवान विष्णू आणि तुळशी यांचा विवाह. तुळशी विवाहानंतर खऱ्या अर्थाने लग्नसराईस प्रारंभ होतो. त्यामुळे दिवाळीनंतर येणाऱ्या तुळशी विवाहाकडे अनेकांच्या नजरा लागतात. यंदाच्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटे पासून ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळ पर्यंत तुळशीच्या लग्नाचा मुहूर्त आहे.
तुळशीच्या लग्नासाठी साहित्य
तुळशी वृंदावन, लाल साडी, हळदी कुंकू, फुले, २ हार, अक्षदा, अंतरपाट, ऊस, चिंचा, बोरे, नैवेद्य अथवा पेढे…..
पूजा व लग्न विधी
तुलसी विवाह म्हणजे तुळशीचे लग्न भगवान विष्णू यांच्याशी लावले जाते. याप्रसंगी विष्णूची मूर्ती अथवा शाळीग्राम ठेवावा.
विवाहाप्रमाणेच परिसर सजवावा.
सर्वप्रथम तुळशी वृंदावन रंगरंगोटी करून सजवावे. त्या भोवती छान फुलांची रांगोळी काढावी. पणत्या लावून परिसर सजवावा.
तुळशी वृंदावनाच्या बाजूला पाटावर शालिग्राम अथवा विष्णूची मूर्ती ठेवावी. पाटाभोवती रांगोळी काढावी.
तुळशीला नववधूप्रमाणे सजवावे. तुळशीला हळदी कुंकू वहावे.
एक हार तुळशीजवळ तर एक हार विष्णू मूर्ती शालिग्राम जवळ ठेवावा.
तुळशीचा मामा म्हणून वृंदावनाजवळ ऊस उभा करावा.
मुहूर्तावर तुळशी व विष्णू यांच्यामध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टका म्हणाव्यात व त्यांचे लग्न लावावे.
मंगलाष्टका नंतर विष्णूचा हार तुळशीला व तुळशीचा हार विष्णूला घालावा.
सनई चौघडांचे संगीत लावावे.
नैवेद्य दाखवून उपस्थितांना पेढे वाटप करावा.
Tradition Tulsi Vivah Importance Muhurta Puja
Pandit Dinesh Pant