नवी दिल्ली – प्रत्येक जातीत, धर्मामध्ये, समुदायामध्ये आणि देशामध्ये लग्नाविषयी वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत, परंतु कधीकधी अशा प्रथा देखील दिसून येतात त्याबद्दल सर्वांना आश्चर्यचकित वाटते. जगात असा एक देश आहे जिथे वधू आणि वर लग्नानंतर तीन दिवस शौचालयात जाऊ शकत नाहीत. कारण तेथे नवविवाहित जोडप्यास लग्नानंतर तीन दिवस शौचालयात जाण्यास मनाई आहे.
वास्तविक सर्वच जाती, धर्म आणि देशात विवाहांसंबंधीचे अनेक विधी धूमधडाक्याने साजरे करण्यात येतात. त्यावेळी लोक मोठ्या आनंदाने नाच- गाणे करतात. मोठा जल्लोष करतात. पण असा कोणत्या प्रकारचा विधी आहे, जेथे विचित्र प्रथा असून असे विचित्र विधी किंवा प्रथा पार पाडणारे लोक आहेत? तर लग्नानंतर इंडोनेशियातील टिडॉंग नावाच्या समाजात ही अनोखी प्रथा किंवा विधी पाळली जाते. या विधीबद्दल बऱ्याच लोकांची श्रद्धा आहेत, त्यामुळे लोक हे विधी करतात.
इंडोनेशियातील बिरादरी असलेल्या टिडॉंग समुदायाचे लोक या विधीला अत्यंत महत्त्वाचे मानतात आणि ते अत्यंत गांभीर्याने हा विधी करतात. या परंपरेमागील विश्वास असा आहे की, विवाह हा एक पवित्र समारंभ आहे. तिडोंग समुदायामध्ये हा विधी पार पाडण्यामागील आणखी एक कारण म्हणजे नवविवाहित जोडप्याला वाईट गोष्टी बघण्यापासून वाचवणे. या समाजातील लोकांच्या समजुतीनुसार, शौचालयात घाण असते, ज्यामुळे तेथे नकारात्मक शक्ती असतात.
लग्नानंतर लगेच वधू-वर शौचालयात गेले तर त्यांना नकारात्मकतेचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या उद्भवू शकतात, नात्यात फाटा येऊ शकतो आणि नवविवाहित जोडप्याचे लग्न मोडू शकते.
तसेच या समाजातील लोकांचा असा विश्वास आहे की, वधू-वरांनी लग्नानंतर ताबडतोब शौचालयाचा वापर केला तर ते त्यांच्यासाठी खूप हानिकारक असू शकते.
अशा परिस्थितीत त्यापैकी दोघांचेही जीवन धोक्यात येऊ शकते, त्यांचे नवी विवाहित जीवन नष्ट होऊ शकते. त्यामुळे लग्नाच्या तीन दिवसांपर्यंत वधू-वरांना कमी अन्न आणि कमी पाणी दिले जाते आणि स्वच्छतागृहात न जाता याची काळजी घेतली जाते जेणे करून ते विधी चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील. विशेष म्हणजे येथे हा विधी अत्यंत काटेकोरपणे पार पाडला जातो.