पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांच्या आकर्षक कार उपलब्ध होत आहेत, त्यातच आता टोयोटाने आपल्या लोकप्रिय कार टोयोटा ग्लान्झा ची नवीन आवृत्ती टोयोटा ग्लान्झा 2022ही लॉन्च केली आहे. ही कार मारुती सुझुकीच्या बलेनोवर आधारित आहे,
या कारची फेसलिफ्ट आवृत्ती काही आठवड्यांपूर्वी लॉन्च झाली होती. त्यानंतर Toyota ने Glanza चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले ज्याची किंमत 6.39 लाख रुपये आहे. कंपनीने ही कार 4 ट्रिममध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये E, S, G आणि V प्रकारांचा समावेश आहे. तसेच ऑटोमॅटिक आणि मॅन्युअलसह या हॅचबॅकचे एकूण 7 प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. ही कार पेट्रोल इंजिनसह लॉन्च करण्यात आली आहे. Glanza ची सुरुवातीची किंमत बेस E ट्रिमसाठी 6.39 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-स्पेक S ऑटोमॅटिक ट्रिमसाठी (एक्स-शोरूम, भारत) 9.69 लाखांपर्यंत जाते.
कार 1.2-लिटर, चार-सिलेंडर ड्युअलजेट K12N इंजिनद्वारे समर्थित आहे, ती मारुती बलेनोमध्ये वापरली जाते. तसेच हे इंजिन 89bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी या कारला 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. एएमटी गिअरबॉक्ससह सुसज्ज असलेली ही भारतातील पहिली टोयोटा आहे. तसेच ही कार उत्तम मायलेज देऊन लॉन्च करण्यात आली आहे.
नवीन ग्लान्झा आणि बलेनोमध्ये बरेच साम्य आहे. पण यावेळी टोयोटाने दोन मॉडेल्समध्ये फरक करण्याचा खूप प्रयत्न केला आहे. यात नवीन केमरी ग्रिल, स्पोर्टियर फ्रंट बंपर आणि साध्या एलईडी डेटाइम रनिंग लाईट ग्राफिक्ससह नवीन हेडलाइट्स मिळतात. सुरक्षिततेसाठी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), 6 एअरबॅग्ज आणि Isofix चाइल्ड सीट अँकरेज यांसारख्या सुरक्षा फिटमेंट्स उपलब्ध आहेत.
मारुतीच्या नवीन बलेनोच्या डिझाइन आणि लेआउटशी बरेच साम्य आहे. यात एक स्तरित डॅशबोर्ड, फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि स्टीयरिंग व्हील डिझाइन मिळते. तसेच संपूर्ण केबिनमध्ये काळ्या आणि बेज रंगाची योजना आहे, ज्यामुळे त्याला एक अपमार्केट लुक मिळतो.
टोयोटाने काही आठवड्यांपूर्वी प्री-बुकिंग घेणे सुरू केले, जे टोयोटाच्या डीलरशिप आणि वेबसाइटवर केवळ 11,000 रुपयांमध्ये केले जात होते. पण आता जर ही कार बुक करायची असेल तर 21,000 रुपये टोकन रक्कम भरून कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा अधिकृत डीलरशिपवरून ती बुक करू शकता.