पुणे – सध्याच्या काळात प्रत्येकालाच आपले स्वतःचे एक वाहन असावे, असे वाटते. त्यामुळे अनेकांनी दिवाळीत नवीन कार खरेदी केली आहे, आपण देखील नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण अनेक वाहन कंपन्यांनी सणासुदीच्या काळानंतरही त्यांची नवीन वाहने लाँच केली आहेत.
टोयोटाने मध्य-पूर्व आशियाच्या बाजारपेठेत मारुती सियाझवर आधारित आपली नवीन सेडान कार ‘टोयोटा बेल्टा’ सादर केली आहे. विशेष म्हणजे ही मारुती सियाझची ही पूर्णपणे रिबॅज केलेली आवृत्ती आहे. म्हणजेच कारचे इंजिन त्या कार सारखेच आहे, तिची वैशिष्ट्ये देखील सारखी आहेत आणि अगदी डिझाइन देखील मारुती सुझुकीसारखेच आहे. मात्र एकमेव बदल म्हणजे टोयोटाचे बॅजिंग होय.
याआधी कंपनीने मारुती विटारा ब्रेझा आणि मारुती बलेनो देखील आपल्या बॅजिंग नवीन नावाने लॉन्च केले आहेत. टोयोटा अर्बन क्रूझरच्या नावाने ब्रेझा लॉन्च करताना कंपनीने कारच्या फ्रंट लूकमध्ये थोडा बदल केला आहे. बाह्य तसेच आतील भागात कोणताही बदल दिसत नाही. त्याची केबिनची रचना आणि मांडणी सियाझ सारखीच आहे.
विशेष म्हणजेच, बॅजिंग व्यतिरिक्त 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, क्लायमेट कंट्रोल स्विच आणि कलर एमआयडीसह अॅनालॉग डायल सारखी वैशिष्ट्ये देखील मिळतील. तसेच इंजिनमध्ये मिडल इस्टमध्ये आणलेली टोयोटा बेल्टा सियाझ प्रमाणेच 1.5 लिटर, 4 सिलेंडर पेट्रोल इंजिनसह देण्यात आली आहे. सदर इंजिन हे जास्तीत जास्त 105hp पॉवर आणि 138Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
तथापि, हे मॉडेल केवळ 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायासह दिले जाते. आता भारतीय बाजारपेठेतील कार ग्राहकांसाठी टोयोटा कंपनी हेच इंजिन आणेल अशी अपेक्षा आहे. मात्र, यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्स दिले जातील. मिडल इस्ट मॉडेल हा लेफ्ट-हँड-ड्राइव्ह (LHD) प्रकार आहे, तर उजव्या हाताने-ड्राइव्ह (RHD) मेड-इन-इंडिया प्रकार भारतातही लॉन्च केला जाईल अशी अपेक्षा आहे.