मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सखोल सुरक्षितता तत्त्व आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाशी संलग्न राहत टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने त्यांची प्रख्यात फॅमिली मूव्हर ‘टोयोटा रूमियन’मध्ये मोठ्या सुधारणांची घोषणा केली.
प्रवासी सुरक्षिततेमध्ये वाढ करण्याच्या दिशेने सक्रिय पाऊल उचलत टीकेएमने प्रत्येक रूमियन व्हेरिएण्टमध्ये सहा एअरबॅग्जची (फ्रण्ट, साइड व कर्टन शील्ड) भर केली आहे. सर्व व्हेरिएण्ट्स आता ड्युअल फ्रण्ट एअरबॅग्ज, दोन्ही बाजूंना एअरबॅग्ज आणि दोन कर्टन शील्ड एअरबॅग्जसह सर्वसमावेशक सर्वांगीण सुरक्षितता देतात, ज्यामधून ड्रायव्हर व प्रवाशांना विविध ड्रायव्हिंग स्थितींमध्ये अधिक संरक्षणाची खात्री मिळते. टोयोटा रूमियन १०.४४ लाख रूपयांच्या (एक्स-शोरूम) सुरूवातीच्या किमतीमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक जवळच्या टोयोटा डिलरशिपमध्ये किंवा ऑनलाइन येथे त्यांची रूमियन एक्स्प्लोअर, बुक किंवा वैयक्तिकृत करू शकतात.
टोयोटाने टॉप व्ही ग्रेडमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस) सादर केले. हे प्रगत वैशिष्ट्य अधिक सुरक्षितता, इंधन कार्यक्षमता व सोयीसुविधेसाठी सतत टायर प्रेशरवर देखरेख ठेवते, ज्यामुळे भारतातील कुटुंबांसाठी तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत एमपीव्ही म्हणून रूमियनचे स्थान अधिक दृढ होत आहे.
टोयोटा रूमियनमध्ये उत्साही डिझाइनसह एैसपैस ७-सीटर लेआऊट आहे. विशिष्ट वैशिष्ट्ये जसे प्रीमियम क्रोम ग्रिल, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी टेल लॅम्प्स आणि ड्युअल-टोन मशिन अलॉई व्हील्स या वेईकलला आधुनिक कुटुंबांसाठी स्टायलिश निवड बनवतात. रूमियनच्या आतील बाजूस प्लश ड्युअल-टोन केबिन, दुसऱ्या रांगेमध्ये स्थिर ६०:४० स्प्लिट आणि तिसऱ्या रांगेत रिक्लायनिंग सीट्स, दुसऱ्या व तिसऱ्या रांगेत एसी आणि सामानासाठी एैसपैस जागा आहे, ज्यामुळे ही वेईकल आरामदायी व वैविध्यपूर्ण आहे.
ग्राहकांना प्रवासाचा आनंद घेण्यासोबत कनेक्टेड ठेवण्यास मदत करत रूमियनमध्ये टोयोटा आय-कनेक्ट आहे, जे स्मार्टवॉच सुसंगता, वॉईस असिस्टण्स सपोर्ट, रिमोट लॉक/अनलॉक, क्लायमेट कंट्रोल आणि सेफ्टी अलर्ट्स देते. १७.७८ सेमी स्मार्टप्ले कास्ट इन्फोटन्मेंट सिस्टमसह वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅप्पल कारप्ले, स्टीअरिंग-माऊंटेड कंट्रोल आणि प्रीमियम आर्कमिस सराऊंड सेन्स* ऑडिओ ड्रायव्हिंग अनुभवाला अधिक उत्साहित करतात.
१.५ लीटर के-सिरीज इंजिनसह निओड्राइव्ह (पेट्रोल) व ई-सीएनजी पर्याय असलेली रूमियन सर्वोत्तम कामगिरी व कार्यक्षमता देते. ग्राहक पेट्रोलसाठी प्रतिलीटर २०.५१ मिमी (एमटी) आणि सीएनजीसाठी प्रतिकिग्रॅ २६.११ किमी इंधन इकॉनॉमीचा, तसेच सुलभ ट्रान्समिशन निवडींसोबत ५एमटी व ६एटीसह पॅडल शिफ्टर्सचा आनंद घेऊ शकतात.
टोयोटाचा दर्जा व विश्वासाच्या हॉलमार्कचे पाठबळ असलेल्या रूमियनमध्ये प्रगत सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत, जसे वेईकल स्टेबिलिटी कंट्रोल (व्हीएससी), हिल होल्ड असिस्ट, एबीएससह ईबीडी, ब्रेक असिस्ट, आयएसओएफआयएक्स (ISOFIX) चाइल्ड सीट माऊंट्स आणि आता सर्व ग्रेड्समध्ये प्रमाणित म्हणून सहा एअरबॅग्ज. ही वेईकल ३-वर्ष/१००,००० किमी वॉरंटीसह येते, जी जवळपास ५ वर्ष/२२०,००० किमीपर्यंत वाढवता येऊ शकते, यासोबत टोयोटाचे एक्स्प्रेस मेन्टेनन्स आणि २४x७ रोडसाइड असिस्टण्स आहे.