अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
काल सापुतारा घाटात दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकी साठी बंद झाल्याने अनेक प्रवाशी अडकून पडले होते. त्यामुळे सुरत – नाशिक मार्गावरील वाहतूक सुरगाणा मार्गे वळविण्यात आली. त्यातच पावसाची संततधार सुरु असल्याने चिराई घाटातीतील अनेक धबधबे डोंगर रांगा मधून फेसळत खाली कोसळत असल्याने सुट्टी संपवून गुजराथला परत जात असलेल्या पर्यटकांनी निसर्गाचे विहंगम दृश्य व निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटला.