शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारत-चीन सीमेवर हिमालयातील या गावाला नक्की भेट द्या

by Gautam Sancheti
जून 10, 2022 | 10:07 pm
in इतर
0
IMG 20210120 WA0017 1

हानले (लडाख)

         आपल्या हटके पर्यटनस्थळांच्या यादीत आवर्जून समाविष्ट करायलाच हवे असे Offbeat Destination म्हणजे हानले! लडाख मधील भारत-चीन सीमारेषेवरील ऐक छोटसं गाव. लेह-लडाखमधील इतर गावांप्रमाणेच साधसुधं.  स्वच्छ असे हे गाव आहे. मात्र, हे गाव आपल्याला आणि जगाला माहित असणे याचे एकच कारण म्हणजे येथे असलेली अंतराळ संशोधन करणारी वेधशाळा म्हणजे हानले आब्झर्वेटरी.

भालेराव e1600854523672
दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880

जगातील सर्वात उंचावर असलेल्या वेधशाळांपैकी एक असलेली ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही वेधशाळा भारताच्या एका कोपर्‍यात इतक्या दुर्गम भागात का बरं बनवली असेल? तिचं कामकाज इतक्या दुरवरुन कसे चालत असेल? तर ही वेधशाळा आणि हानलेमधे १७ व्या शतकात उभारलेली माॅनेस्ट्री या दोन्ही गोष्टी जितक्या अचंबित करणार्‍या आहेत तितकच या गावाच्या माथ्यावर रोज हजारो तार्‍यांनी सजणारं आकाशसुद्धा! तर जगाच्या एका छोट्याशा कोपर्‍यात लपलेल्या या जादूई दुनियेची सफर आपण करुयात.

हानले ही दरी हानले नदीपासून बनली आहे. पुढे ही नदी इमिसला पास करुन लोमा या गावात सिंधू नदीला मिळते. जिथे भारत आणि तिबेटची सिमा आहे. हानलेला जाण्यासाठी लेह येथून पेंगोंग मार्गे जाता येते. पेंगोंग-चुसुल मार्ग आहे. ब्रीज वरुन पुढे काकसांगला पास या भागातून हानलेला जाता येते. मात्र हा रस्ता अतिदुर्गम भागातून जातो. पुढे त्सो मोरीरी हा एक तलाव (लेक) आहे. तोही परिसर नयनरम्य आहे. यासाठी येथे फिरतांना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO)चे आपण आभार मानू तितके कमीच आहेत.

हानले गाव समुद्रसपाटीपासून जवळ जवळ ४५०० मीटर म्हणजेच १४ हजार ७६४ फुट उंचीवर वसलेलं हे गाव आहे. हे सर्व तुम्ही जेव्हा तिथे जाल तेव्हाच अनुभवाल. येथे जाण्याचा अजून एक अतिशय सुंदर मार्ग म्हणजे मनाली-लेह. हा मार्ग नवीनच सुरु झालेल्या अटल टनेलमधूनच जातो. आता तर येथे या मार्गावर पूर्ण बर्फाची चादर पसरलेली असते. या परिसरातील प्रवासही एक खुप सुंदर अनुभव आहे. या संपूर्ण परिसरात फिरतांना स्थानिक गावकर्‍यांची कामासाठी चालणारी लगबग, बायकांची ओझी घेऊन फिरतांना सोबत तान्हुल्यालाही सांभाळणे, लहान लहान, गोरी गोमटी, लाल गोबरे गाल असलेली शाळेत जाणारी मुले, सदैव हातावर विणकाम करणार्‍या वयस्कर बायका हे सर्व मन मोहवून टाकतात. येथे जगण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागते. पण तो त्रास कुणाच्याही चेहर्‍यावर दिसत नाही. मात्र एक गोष्ट सदैव जाणवते ती म्हणजे ही मंडळी एका वेगळ्याच जगात राहतात. चला तर मग अशा भारतात जाऊया जो आपल्याला अगदीच वेगळा भासेल.

राहण्याची सोय
या दुर्गम भागात जेमतेम ३०० लोकसंख्या आहे. त्यामुळे येथे हाॅटेल्स नाही.त पण होम स्टे सुंदर आहेत. लडाखी लोक कसे शांतता प्रिय आहेत याच दर्शन इथे होतं.

केव्हा जाल
हानले येथे जाण्यासाठी जून ते सप्टेंबर हाच कालावधी योग्य आहे. बाकी इतर ८ महिने हा रस्ता बर्फाच्छादित असतो. जुलै व ऑगस्ट महिना येथे उन्हाळा असतो. या काळातही येथील सर्वाधिक तापमान ७/८ अंश सेल्सियसच्या वर जात नाही. अशा या हटके ठिकाणची सहल करायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा आठवड्याचा शेवटचा दिवस; वाचा, शनिवार (११ जून)चे राशिभविष्य

Next Post

वडनेर भैरवचे लाचखोर दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात; ४० हजार घेताना रंगेहाथ पकडले

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
sushila kargi
मुख्य बातमी

अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की …अंतरिम सरकार स्थापन

सप्टेंबर 12, 2025
road 1
संमिश्र वार्ता

येवला तालुक्यातील या जिल्हा मार्ग रस्त्यांची राज्य मार्गात दर्जोन्नती…

सप्टेंबर 12, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

अतिवृष्टीमुळे नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाखाची मदत….या जिल्ह्यातील शेतक-यांना मिळणार लाभ

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0319 scaled e1757675834888
स्थानिक बातम्या

नाशिकच्या जलतरणपटूंनी कॅटालिना चॅनल रिले मोहीम यशस्वी करून रचला इतिहास…

सप्टेंबर 12, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये विद्युत उपकेंद्रातील रोहित्र क्षमतावाढीचे काम सुरु…शनिवारी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

सप्टेंबर 12, 2025
jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

वडनेर भैरवचे लाचखोर दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात; ४० हजार घेताना रंगेहाथ पकडले

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011