मुंबई – राज्यात कोरोनाचा उद्रेक थांबत नसल्याने अखेर संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे निश्चित झाले आहे. यासंदर्भारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (२१ एप्रिल) यासंदर्भातील घोषणा करणार आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. हा संपूर्ण लॉकडाऊन आगामी १५ दिवसांचा असेल. राज्यात सध्या कलम १४४ लागू करण्यात आला आहे. तरीही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला नाही. दिवसेंदिवस हजारो बाधित होत आहेत. या सर्वांसाठी आरोग्य सुविधा अत्यंत तोकड्या पडत आहेत. ऑक्सिजन, बेड, रेमडेसिविर इंजेक्शन, डॉक्टर, नर्स आदींची उपलब्धता करणे अशक्य झाले आहे. यापूर्वी अनेकदा आवाहन करुनही गर्दी ओसरलेली नाही. सध्या राज्यात तुरळ सेवा सुरू आहेत. त्यात परिवहन आणि अत्यावश्यक सेवांचा समावेश आहे. राज्यात उद्यापासून लागू होणाऱ्या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये उद्योग, परिवहन सेवा बंद होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.