नवी दिल्ली – प्रसिद्ध सॉफ्टवेअर निर्माता कंपनी विप्रोचे संस्थापक-अध्यक्ष अजीम प्रेमजी यांनी २०२१ या आर्थिक वर्षात ९,७१३ कोटी रुपये म्हणजेच दररोज २७ कोटी रुपये दान केले आहेत. दान देण्याच्या यादीत आता अजीम प्रेमजी सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. अजीम प्रेमजी यांनी कोरोना महामारीच्या काळात दान देण्यात एक चतुर्थांश वाढ केली आहे. Edelgive Hurun India Philanthrophy List 2021 नुसार, एचसीएलच्या शिव नादर दुसर्या स्थानावर आहेत. त्यांनी १,२६३ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
उद्योगपतींचे योगदान
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी ५७७ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. दान देणार्यांच्या यादीत ते तिसर्या स्थानावर आहेत. कुमार मंगलम बिर्ला यांनी ३७७ कोटी रुपयांचे दान दिले आहेत. देशातील दुसरे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी आपत्कालीन निधीमध्ये १३० कोटी रुपये दान केले आहेत. ते यादीत आठव्या स्थानावर आहेत. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकेणी यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. त्यांनी १८३ कोटी रुपये दान केले आहे. सामाजिक विचाराला प्राधान्य देणार्यांमध्ये त्यांना ओळखण्यात आले आहे.
Hurun India चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संशोधक अनास रेहमान जुनैद म्हणाले, की सध्याच्या परिस्थितीत बहुतांश पैसे पायाभूत गरजांसाठी शिक्षण आणि आरोग्य या पायाभूत सुविधांमध्ये जात आहे. नीलकेणी यांनी खरोखरच रोचक योगदान दिले आहे. या यादीत काही नवीन नावांचा समावेश झाला आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी २०२१ मध्ये शिक्षण क्षेत्रात आपल्या एकूण मिळकतीतील एक चतुर्थांश भाग म्हणजेच ५० कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. आगामी दहा वर्षांमध्ये आमच्याकडे व्यापक नागरिक सामाजिक मुद्दे प्राधान्याने असतील.