पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – केंद्र सरकारने गारेना फ्री फायर या लोकप्रिय मोबाइल गेमसह 54 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडतेच्या दृष्टीने सरकारने गेमिंग अॅप्सवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गारेना फ्री फायर गेमर्स चांगलेच नाराज झाले आहेत. पण त्यांच्या नाराजी तथा त्रासाचे कारण निरर्थक आहे, कारण भारतीय बाजारपेठेत गारेना फ्री फायर (Garena Free Fire) शी स्पर्धा करण्यासाठी अनेक उत्तम गेम उपलब्ध आहेत. हे सर्व 5 मोबाईल गेम पूर्णपणे मोफत आहे. विशेष म्हणजे Android आणि iOS दोन्ही मोबाईल वापरकर्ते ते वापरू शकतात.
1. PUBG न्यू स्टेट हा बॅटल रॉयल व्हिडिओ गेम आहे. जे क्राफ्टनने बनवले आहे. दि 11 नोव्हेंबर 2021 रोजी तो प्रसिद्ध झाला. यामध्ये जास्तीत जास्त 64 खेळाडू समोरासमोर आहेत. गेमिंगसाठी पिस्तूल, स्मोक ग्रेनेड विनामूल्य उपलब्ध आहे. तर ड्रोनसाठी काही पैसे द्यावे लागतील.
2. कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल गेम जवळपास 100 दशलक्ष वेळा डाउनलोड झाला आहे. हा सर्वाधिक खेळला जाणारा मल्टी प्लेयर गेम आहे. यात टीम डेथमॅच, डोमिनेशन, स्टँडऑफर सारखे क्लासिक मल्टीप्लेअर मोड आहेत. यामध्ये जवळपास 100 प्लेअर बॅटल मोड देण्यात आले आहेत.
3. Knives Out गेमिंग अॅप विशेषत: अननोन बिटल ग्राऊंड द्वारे प्रेरित आहे. यामध्ये PUBG च्या काही नियम आणि शर्ती आढळतील. यात एका संघात 5 सदस्य असतात, जे स्निपर बॅटल, 50 विरूध्द 50 आणि टीम फाईट सारख्या विविध मोड्ससह येतील.
4. होपलेस बिटल ग्राऊंड हा गेम अगदी फ्री फायरसारखा आहे. या गेममध्ये खेळाडूला शेवटचा सामना खेळावा लागतो. या गेमच्या एका सामन्यात जास्तीत जास्त 121 खेळाडू एकत्र खेळू शकतात.
5. पिक्सेल अननोन बिटल ग्राऊंड हा गेम PUBG गेमचीच अॅनिमेटेड आवृत्ती आहे. ते आतापर्यंत जवळपास 50 दशलक्ष वेळा डाउनलोड केले गेले आहे. यात विविध प्रकारचे ग्राफिक्स कार्ड, विविध स्किन आणि 30 हून अधिक शस्त्रे आहेत.