इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण उद्या (शनिवार, ३० एप्रिल) होत आहे. विशेष म्हणजे, उद्याच शनि अमावस्याही आहे. म्हणजेच सूर्यग्रहण आणि शनि अमावस्या असा योगायोग जुळून आला आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार शनिवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी सूर्यग्रहणाला प्रारंभ होणार आहे. हे सूर्यग्रहण पहाटे ४ वाजून ७ मिनिटांपर्यंत राहणार आहे. अमेरिकेच्या नासा या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सूर्याचा जवळपास ६५ टक्के भाग हा चंद्रामुळे झाकला जाणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. तर, अंटार्क्टिका, प्रशांत महासागर, दक्षिण अमेरिका, अटलांटिक या भागामध्ये दिसणार आहे. हे आंशिक प्रकारचे सूर्यग्रहण आहे. म्हणजेच, सूर्याचा केवळ अर्धाच भाग या ग्रहण काळात झाकला जाणार आहे.