विशेष प्रतिनिधी, मुंबई
टॉलीवूडच्या प्रसिद्ध नट्यांपैकी एक सामंथा रुथ प्रभू हिची आता नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. तिचा बोल्ड आणि रफ-टफ अंदाज सौंदर्यात अधिकच भर घालतो. सामंथाचा अभिनय प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्गही मोठा आहे. तिच्या वाढदिवसाचीही चाहते वाट बघत असतात. मात्र तिचा संघर्ष मोठा आहे. एकवेळच्या जेवणाची भ्रांत असलेली सामंथा आज कोट्यधीश आहे.
२०२० मध्ये या माया चेस्वे या चित्रपटाने तिचे टॉलीवूडमध्ये पदार्पण झाले. आता दरवर्षी तिचे किमान तीन ते चार चित्रपट प्रदर्शित होतात. आज कोट्यधीश असलेल्या सामंथाने पैश्यांची चणचण असल्यामुळे चित्रपटसृष्टीत राय ठेवला होता. त्यापूर्वी ती छोटे-मोठे पार्ट टाईम जॉब करायची. मात्र त्यातून तिचे भागायचे नाही. त्यामुळे तिने चित्रपटांमध्ये नशीब आजमावून बघितले. आणि आज ती साऊथमधील यशस्वी नट्यांपैकी एक आहे.









