टोकियो – येथील पॅरॉलिम्पिकमध्ये भारतासाठी सोमवारचा दिवस “सोनियाचा दिनु ” ठरला. भारतीय अॅथलिट्सनी दमदार कामगिरी करत १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्यपदक पटकाविले आहे. अवनी लेखराने नेमबाजी स्पर्धेत सुवर्णवेध घेतला. योगेश कथुरियाने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत आणि देवेंद्र झाझारियाने भालाफेक स्पर्धेत स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. तर सुंदरसिंह गुर्जरने कांस्यपदक मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. अवनीने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात २२९.१ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पॅरॉलिम्पिकमध्ये भारताचे हे सुवर्णपदक आहे.पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत योगेश कथुरियाने ४४.३८ मीटरचा सर्वोत्तम फेक करत रौप्यपदक पटकावले. तर ब्राझीलच्या बेटिस्टा डॉस सँतोस क्लॉडिनने ४५.५९ मीटर फेक करत सुवर्णपदक मिळविले आहे. पॅरॉलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रविवारीसुद्धा भारताने तीन पदकांची कमाई केली होती. रविवारी मिळालेल्या दोन पदकांमध्ये दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.
पंतप्रधानांकडून कौतुक
अवनी लेखराने सुवर्णपदक पटकावल्याबद्दल तसेच देवेंद्र झाझारिया आणि योगेश कथुरियाने रौप्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.”विलक्षण कामगिरी. अवनी लेखरा तुझ्या मेहनती स्वभाव आणि नेमबाजीच्या आवडीमुळे हे शक्य झाले आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा “, असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.