नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी कुमार दहिया ५७ किलो गटात फायनलमध्ये पोहचला आहे. रवी कुमारने सेमी फायनमध्ये कझाकस्तानच्या पैलवानाचा पराभव केला आहे. या आनंदाच्या बातमीनंतर दहियाच्या घरी जल्लोष व्यक्त केला जात आहे. रवी कुमारच्या या यशामुळे भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटूनी चांगली कामगिरी केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला हे चौथे पदक ठरणार आहे. याअगोदर वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चून रौप्य, बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने कास्य पदक तर बॅाक्सर लव्हलिन बोर्गोहेनने कास्य पदक पटकावले आहे.