टोकियो – कोरोनाच्या संसर्गामुळे वर्षभर लांबलेली आणि आता होऊ घातलेली ऑलिम्पिक स्पर्धा पुन्हा एकदा वादात सापडली आहे. अवघ्या दोन ते तीन दिवसांनी ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी जगभरातून स्पर्धक टोकियोमध्ये दाखल झाले आहेत. या स्पर्धकांना आयोजकांकडून कंडोमचे वाटप करण्यात आले. त्यामुळे ही बाब चर्चेची ठरली आणि अनेकांनी त्यावरुन टीका केली आहे. हा वाद शमत नाही तोच आता नवा वाद निर्माण झाला आहे. खेळाडूंना विश्रांतीसाठी आयोजकांनी अनोखे बेड उपलब्ध करुन दिले आहेत. अँटी सेक्स बेड असे त्याचे नाव आहे. या बेडवरुन अनेक खेळाडूंनी आयोजकांना लक्ष्य केले आहे.
काय आहे अँटी सेक्स बेड
इतर बेड सारखाच हा बेड असला तरी त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो तकलादू असतो. कार्डबोर्ड पासून तो तयार केला जातो. या बेडवर केवळ एकच व्यक्ती झोपू शकते. एकापेक्षा अधिक व्यक्ती झोपल्या तर हा बेड तुटतो. या बेडवर सेक्स करणे शक्य होणार नाही, म्हणून आयोजकांनी हा बेड दिला आहे.
वजनदार खेळाडूंचे काय
ज्या खेळाडूंचे वजन अधिक आहे ते या बेडवर कसे झोपू शकतील, असा प्रश्न काही खेळाडूंनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आयोजकांना नक्की काय साध्य करायचे आहे, खेळाडूंची सोय बघितली आहे की गैरसोय अशी टीकाही केली जात आहे.
https://twitter.com/Paulchelimo/status/1416240846039523331