टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी भारताचे पदकाचे खाते उघडणारी वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू आणखी एक इतिहास रचणार आहे. मीराबाई हिच्या नशिबात थेट सुवर्णपदकच असल्याची बाब समोर येत आहे. या सुवर्णयोग एका निमित्ताने घडून येणार आहे. त्यामुळे सध्या याची सर्वत्र चर्चा होत आहे.
४९ किलो वजनी गटात तब्बल २०२ किलो वजन उचलून मीराबाईने रौप्य पदक पटकावले आहे. याच सामन्यात चीनच्या झीयू हौ हिने सुवर्णपदक पटकावले आहे. मात्र, झीयू हिची डोपिंग टेस्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही टेस्ट झाली आणि त्यात जर ती दोषी आढळली तर सहाजिकच तिचे सुवर्णपदक काढून घेतले जाणार आहे. परिणामी, हे सुवर्णपदक मीराबाई हिला मिळणार आहे. तसे झाले तर वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळविणारी मीराबाई ही पहिली भारतीय खेळाडू ठरणार आहे. एक प्रकारे हा इतिहासच घडणार आहे. मीराबाई ही मणिपूरची असून मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी तिला एक कोटी रुपयांचे बक्षिस जाहिर केले आहे. तसेच, तिला सरकारी नोकरीची ऑफरही दिली आहे.
https://twitter.com/NBirenSingh/status/1418932971403419655