नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्याच दिवशी इतिहास घडला आहे. भारतीय खेळाडू मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले सिल्व्हर मेडल मिळवून दिले आहे. २१ वर्षानंतर भारताला वेटलिफ्टिंगमध्ये हे मेडल ऑलिंपिकमध्ये मिळाले आहे. चानू यांच्या यशाबद्दल पंतप्रधान व राष्ट्रपदींनी अभिनंदन केले आहे. जपानची राजधानी टोकियो येथे काल सुरू झालेल्या ऑलिम्पिकमध्ये यंदा भारतीय खेळाडूंचा मोठा चमू सामील झाला आहे. भारतातून प्रथमच ११९ इतका मोठा खेळाडूंचा गट या जागतिक स्पर्धेत उतरला आहे. चानू यांचे यश देशाला उत्साहित करणारे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन सांगितले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1418823182702694400?s=20