मुंबई – टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला बॉक्सिंग स्पर्धेचं कांस्यपदक लव्हलिन बोर्गोहेन हिने जिंकले आहे. तुर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीन हिच्याविरुद्ध लव्हलिन जिंकली नसली तरी तिनं देशवासियाचं मन जिंकली आहेत. टोकियो ऑलिंपिकमध्ये देशाला तिसरं पदक जिंकून देत तिने देशाचा गौरव, देशवासियांचा आनंद बहुगुणीत केला आहे. लव्हलिननं जिंकलेल्या कांस्यपदकाचं मोल सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. मुष्ठीयुद्धाचा गौरवशाली इतिहासात असलेल्या भारतात लव्हलिनच्या यशापासून प्रेरणा घेऊन अनेक मुली पुढे येतील. देशाचा गौरव वाढवतील”, अशा शब्दात भारतवासिय तिचे कौतुक करीत आहेत.
लव्हलिन बोर्गोहेननं ऑलिंपिक बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटातलं ऑलिंपिकपदक आधीच निश्चित केलं होतं. उपान्त्यफेरीत विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीनकडून पराभव पत्करावा लागला तरी, तिनं कडवी झुंज दिली. तीच्या मेहनतीचा, यशाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. लव्हलिननं जिंकलेले ऑलिंपिक पदक भारतीय बॉक्सिंगचा नवी ऊर्जा, प्रेरणा देईल. विजेंदरसिंगनं २००८ मध्ये, मेरी कोम हिनं २०१२ मध्ये जिंकलेल्या बॉक्सिंगच्या ऑलिंपिक पदकांनंतर देशासाठीचं तिसरं ऑलिंपिक पदक जिंकून लव्हलिननं इतिहास घडवला आहे.
आज सेमीफायलच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन टर्कीची बॉक्सर सुरमेनेली हिला नमवून रौप्य पदक पटकावण्याची संधी लवलीना हिच्याकडे होती. परंतु अटीतटीच्या सामन्यात सुरमेनेली हिने लवलीना हिला ५-० अशा फरकाने नमवत पुढची फेरी गाठली. त्यामुळे लवलीना हिला कास्य पदक मिळाले आहे. भारताला ऑलिम्पिक खेळात पदक मिळवून देणारी लवलीना तिसरी बॉक्सर असून दुसरी महिला बॉक्सर आहे. याआधी २००८ मध्ये बीजिंग ओलिम्पिकमध्ये विजेंदर सिंहने कांस्य पदक जिंकले होते.
२०१२ लंडन ओलिम्पिकमध्ये मेरी कोम हिने कांस्य पदकावर नाव कोरले होते. विशेष म्हणजे लवलीना हिने मात्र पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धा खेळताना पदक मिळवले आहे. या सामन्यात दोन्ही बॉक्सरनी उत्तम खेळ दाखवला. परंतु टर्कीच्या सुरमेनेलीने चपळ खेळ दाखवत सुरुवातीपासून सामन्यावर दबदबा कायम ठेवला. ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सहभागी होणाऱ्या २३ वर्षीय लवलीना हिने आतपर्यत १४ सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे सेमीफायनल जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या टर्कीच्या बुसानाज हिचा हा २६ वा विजय होता.