मुंबई – जगभरात जपानची ओळख कल्पक देश म्हणून आहे. कल्पकता आणि समर्पणामध्ये जपानचा हात कुणीही पकडू शकत नाही, याची प्रचिती देणारे आणखी एक उदाहरण जपानने टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्ताने दिले आहे. टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये विजेत्यांना जी पदके दिली जात आहेत, ती चक्क कचऱ्यापासून तयार केली आहेत.
आश्चर्य वाटले असेल, पण ते खरे आहे. मोबाईल, लॅपटॉप यालह सर्वप्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेसच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून 500 सुवर्ण, रौप्य व कास्य पदक तयार करण्यात आले आहेत. जपान सरकारने दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्तरावर मोहीम राबवून खराब आणि फेकून दिलेले मोबाईल फोन, लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस एकत्र केले. त्यावर प्रक्रिया केली आणि 23 जुलैपासून सुरू झालेल्या ऑलिम्पिकमध्ये वापरण्याकरिता तयार केले. त्यासाठी जपाननने शहर, छोट्या वस्त्या आणि गावांची 90 टक्के मदत घेतली. जपानने एकूण 80 टन ई-कचरा गोळा केला आणि त्यातून 32 कोली सोने, 23 हजार 492 ग्राम चांदी व 2 हजार 200 ग्राम कास्य खरेदी केले.
रिओ ऑलिम्पिकमध्येही हेच चित्र
अशाच पद्धतीने रिओ ऑलिम्पिकमध्येही 30 टक्के सोने आणि चांदी कारचे पार्टस् आणि काचा यांच्यावर प्रक्रिया करून उभे करण्यात आले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मात्र एक पाऊल पुढे टाकून संपूर्ण देशातून यासंदर्भात तयारी करण्यात आली. याची तयारी 2017 मध्ये सुरू झाली. त्यात 2 मिनीटांच्या व्हिडीओद्वारा कॅम्पेन सुरू करण्यात आले. सामाजिक संघटनांनी यात मोठी मदत केली.