टोकियो (जापान) – टोकिया ऑलिम्पिकमधील आठवा दिवस भारतासाठी चांगला ठरला. बॉक्सर लवलीनाने देशाच्या नावावर आणखी एक पदक मिळविले आहे. महिलांच्या बॉक्सिंग स्पर्धेत ६९ किलो वजनीगटात तिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. चीनच्या ताईपेची बॉक्सर निएन चीन चेन हिला ४-१ अशी पराभूत केले. महिला हॉकीमध्ये भारताने आयर्लंडला १-० ने पराभूत केले. दीपिका कुमारीला उपउपांत्यफेरीत महिलांच्या एकेरी तिरंदाजी स्पर्धेत पराभव पत्करावा लागला. कोरियाच्या आन सनने तिला ६-० असे पराभूत केले.
थावपटू अविनाश साबळे तीन हजार पुरुषांच्या स्टिपलचेज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. नेमबाजीत मनू भाकरसुद्धा महिलांच्या २५ मीटर एअर पिस्टल एकेरी स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही. बॉक्सर सिमरनजीत कौर ६० किलो महिला वजनीगटात अंतिम १६ सामन्यात पराभूत झाली. तिला थायलंडच्या सुदापोर्न सिसोंदीने ५-० ने पराभूत केले.
बॅडमिंटन महिला उपउपांत्य फेरीत पी. व्ही. सिंधू प्रतिस्पर्ध्यासमोर आव्हान ठेवणार आहे. पुरुष हॉकी संघांचा जापानसोबत सामना रंगणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सातवा दिवसही भारतासाठी चांगला ठरला. मेरी कॉमचा सामना वगळल्यास इतर सर्व भारतीय अॅथलिटनी चांगले प्रदर्शन केले.
दीपिका कुमारीचा पराभव
जगात पहिल्या क्रमांकावर असलेली तीरंदाज दीपिका कुमारीचा तिसर्या सेटमध्ये पराभव झाला. तिच्या पराभवानंतर पदक मिळविण्याच्या आशेवर पाणी फेरले गेले. उपउपांत्यफेरीत दीपिकाला कोरियाच्या आन सनने ६-० ने पराभूत केले. दीपिकाने तिसर्या सेटमध्ये ७,८,९ असा स्कोअर केला. कोरियाच्या खेळाडूने ८,९,९ असा स्कोअर करण्यात यशस्वी ठरली. या सामन्यात दीपिका कुमारीला शेवटपर्यंत लयच सापडली नाही. सामन्यामध्ये ती फक्त दोन वेळा १०-१० असा स्कोअर करू शकली. तर आन सनने तीन वेळा १०-१० असा स्कोअर करू शकली.
अविनाश साबळेची निराशा
तीन हजार पुरुषांच्या स्टिपलचेज स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळे अंतिम सामन्यात प्रवेश करू शकला नाही. त्याने चांगले प्रदर्शन करून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. परंतु अंतिम सामन्यासाठी पात्र ठरू शकला नाही. तो सातव्या स्थानावर राहिला. अविनाश ८ः१८ः१२ या वेळेत राष्ट्रीय विक्रम करण्यास यशस्वी ठरला. अविनाशने मार्चमध्ये फेडरेशन चषकात आपल्या ८ः२०ः२० या विक्रमाला मागे टाकले आहे.
मनू भाकरचे अपयश
नेमबाज मनू भाकरने पुन्हा एकदा निराश केले. महिलांच्या २५ मीटर एअर पिस्टल स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचू शकली नाही. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी तिला टॉप ८ मध्ये राहणे आवश्यक होते. परंतु असे होऊ शकले नाही. मनू भाकर ११ व्या स्थानावर राहिली. तिने रॅपिड राउंडमध्ये २९२ गुण मिळविले. प्रिसिजन राउंडमध्ये मनू पाचव्या क्रमांकावर राहिली.
सिमरनजीत कौरचा ५-० ने पराभव
बॉक्सिंगमध्ये भारताच्या हाती निराशा लागली. सिमरनजीत कौर ६० किलो वजनीगटात अंतिम १६ सामन्यात पराभूत झाली. पहिल्या फेरीतच ती स्पर्धेबाहेर गेली. थायलंडच्या सुदापोर्न सिसोंदीने तिचा ५-० ने पराभव केला. या पराभवानंतर सिमरनजीत कौर ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर गेली.
लवलीना उपांत्य फेरीत
भारताची बॉक्सर लवलीन बोरगोहेनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. ती उपांत्यफेरीत पोहोचली आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात आणखी एक पदक पक्के झाले आहे. उपउपांत्यफेरीत तिने महिलांच्या ६९ किलो वजनीगटात चीन ताईपेच्या निएन चीन चेन हिला ४-१ ने पराभूत केले.
दुती चंदकडून निराशा
धावपटू दुती चंदनच्या पदरात निराशा आली आहे. यंदा तिच्याकडून पदकाची आशा केली जात होती. परंतु तिच्याकडून भ्रमनिरास झाला. महिलांच्या १०० मीटर (हिट ५) मध्ये ती सातव्या क्रमांकावर राहिली.
हॉकीत आयर्लंडचा पराभव
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने विजयाचे खाते उघडले. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात राणी रामपाल हिच्या नेतृत्वाखालील संघाने १-० असा विजय मिळविला. या विजयामुळे उपउपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संघाची आशा कायम आहे.