विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
जपानमधील टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, परंतु त्यानंतर याच शहरात झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी देशाची मान उंचावत अधिक चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये भारताला एकूण ५३ पदके मिळण्याची अपेक्षा आहे. कारण भारतीय खेळाडू पॅरालिम्पिक खेळांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. सुमारे ५४ खेळाडूंच्या भारतीय संघाने विविध स्पर्धांमध्ये आतापर्यंत एकूण १० पदके जिंकली आहेत. १ ते ५ सप्टेंबर पर्यंत होणाऱ्या १५ स्पर्धामध्ये म्हणजे अॅथलेटिक्स ते नेमबाजी तसेच बॅडमिंटन आदि सारख्या, २० पेक्षा जास्त खेळाडू अजूनही पदकांच्या शर्यतीत आहेत, विशेष म्हणजे यातील अनेक पदक विजेत्यांना पुन्हा संधी मिळणार आहे भारतीय संघ आता पॅरालिम्पिकचा पदक जिंकण्याचा यापुर्वीच्या सर्व वेळेचा विक्रम मोडण्याकडे डोळे लावून बसलेला आहे.
भारताने १९६८ मध्ये पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणे सुरू केले. तेव्हापासून २०१६ पर्यंत एकूण ९५ भारतीय खेळाडू केवळ १२ पदके जिंकू शकले आहेत. आता यंदाच्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या ५४ खेळाडूंच्या संघाने आतापर्यंत १० पदके जिंकली आहेत. तसेच ५ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये अजून ५ दिवस शिल्लक आहेत. या दरम्यान भारताला किमान १५ स्पर्धांमध्ये संधी मिळेल. एकूण २३ खेळाडूंनी अद्याप यात भाग घेतला नाही, सदर स्पर्धक पदकाचे मोठे दावेदार आहेत. या स्पर्धांमध्ये भारत जिंकला तर पॅरालिम्पिकमध्ये १२ पदके जिंकण्याचा विक्रम मोडला जाईल.