टोकियो – पॅरॉलिम्पिकमध्ये भारताच्या सिंहराजने पुरुषांच्या नेमबाजीत दहा मीटर एअर पिस्तुलच्या प्रकारात अंतिम सामन्यात कांस्यपदक पटकावले आहे. नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या एअर पिस्तुल प्रकारात एसएच-१ च्या अंतिम सामन्यात भारताच्या सिंहराज अडानाने २१६.८ अंकांनी सुवर्णपदाकाला गवसणी घातली. पदकाचे दावेदार मनीष नरवाल अंतिम सामन्यात विशेष काही करू शकला नाही. दुसर्या फेरीत तो बाहेर पडला. तत्पूर्वी महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत भारताच्या रुबिना फ्रांसिस फायनलमधून बाहेर पडली आहे. ती १२८.५ अंकासह अंतिम फेरीत सातव्या स्थानावर राहिली. तिरंदाजी स्पर्धेत राकेश कुमार पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत उपांतपूर्व फेरीत पराभूत झाला आहे. राकेश कुमारला वैयक्तिक कंपाउंड खुल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात चीनच्या शिनलियांगने १४५-१४३ अशा फरकाने पराभूत केले.
महिला टेबल टेनिसमध्ये भाविना पटेल आणि सोनल पटेल या भारतीय संघाने चीनच्या झोऊ यिंग आणि झांग बियानने सरळ सेटमध्ये मात दिली. भारतीय संघाला चीनने ११-२, ११-४, ११-२ अशा फरकाने हरविले. गेल्या सहा दिवसात भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण पदकांसह एकूण पाच पदके पटकावले होते.