इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशातील अनेक नागरिक परदेशात जाण्याचा विचार करत असतात, मात्र त्याआधी त्या देशाने लागू केलेल्या कायद्यांची माहिती घेणे आवश्यक ठरते. कारण प्रत्येक देशाची नियम, कायदे आणि संस्कृती ही वेगळी असते. असे काही देश आहेत, जिथे कायदे सर्वांना आश्चर्यचकित करतील असे आहेत. विचार करायला भाग पडेल की हा देखील एक कायदा आहे.
च्युइंगम खाण्यास मनाई :
सिंगापूरमध्ये असताना जर च्युइंगम खाण्याचा विचार करत असाल तर हा विचार लगेच मनातून काढून टाका. कारण 1992 पासून सिंगापूरने च्युइंगमच्या विक्रीवर आणि वापरावर बंदी घातली आहे. कोणीही ते विकताना किंवा ताब्यात घेतल्यास 1,00,000 US डॉलर्सचा मोठा दंड भरावा लागतो. याशिवाय दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. सिंगापूरच्या कायद्यानुसार, च्युइंगम्स पर्यावरणाला हानी पोहोचवण्यास जबाबदार आहेत, कारण ते कुजण्यास आणि जमा होण्यास अनेक वर्षे लागतात. तथापि, 2004 मध्ये, कायदा काहीसा शिथिल करण्यात आला आणि नागरिक च्युइंगम खाऊ शकतील जर त्यांच्याकडे योग्य डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल.
रात्री 10 नंतर टॉयलेट फ्लश करण्यास मनाई :
प्रत्येक घरात टॉयलेटची तथा संडास बाथरूमची स्वच्छता केली जाते. सार्वजनिक ठिकाणी देखील टॉयलेट स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न असतो. परंतु हे जाणून आश्चर्य वाटेल की, स्वित्झर्लंडमध्ये रात्री 10 नंतर आणि सकाळी 7 वाजण्यापूर्वी टॉयलेट फ्लश करणे ध्वनी प्रदूषण मानले जाते. तेथील कायदा तसे सांगतो.
बुद्धांसोबत सेल्फी घेण्यावर बंदी :
श्रीलंकेत भगवान बुद्ध मूर्तींसोबत सेल्फी घेण्यास बंदी आहे. एखाद्या मूर्तीकडे पाठ फिरवणे आणि फोटो काढणे हा श्रीलंकेत गंभीर गुन्हा आहे. जर असे केले तर तुम्हाला फोटो डिलीट करण्यास भाग पाडले जाईल आणि तसे न केल्यास पोलिसांना बोलावले जाईल.
पत्नीचा वाढदिवस विसरल्याप्रकरणी पतीला तुरुंगात टाकण्यात येते :
आपल्या पतीने आपला वाढदिवस विसरल्याच्या अनेक महिलांच्या तक्रारी सोमोआ, ओशिनियामध्ये पोलीसात येत असतात, कारण समोआ देशाने पत्नीचा वाढदिवस विसरणे बेकायदेशीर ठरवले आहे. पत्नींना या चुकीबद्दल पोलिस तक्रार करण्याचा अधिकार आहे, त्यासाठी पतीला काही काळ लॉकअपमध्ये जावे लागू शकते.
कबुतरांना खायला देऊ नका :
व्हेनिस, इटलीला भेट देता तेव्हा कबुतरांबद्दल तुमचे प्रेम दाखवू नका. सिएना कॅथेड्रल, सेंट मार्क स्क्वेअर आणि मिलानच्या ड्युओमोमध्ये कबुतरांच्या मोठ्या लोकसंख्येमुळे अडचणी निर्माण होतात कारण हे पक्षी आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात आणि स्मारकांनाही नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे, जर नागरिक कबुतरांना खायला घालताना आढळले, तर इटालियन सरकारनुसार त्यांच्याकडून 700 युरोपर्यंत शुल्क आकारले जाईल.
Toilet Flush After 10 pm Various Countries interesting laws