नाशिक – शहरातील अनेक केद्रांवर आज कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविशिल्ड या लसीचा तुटवडा होता. मात्र, तो दूर झाला आहे. कोवॅक्सिन ही लस गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपलब्ध आहे. लसीच्या अनुपलब्धतेमुळे नाशिककरांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आज लसीकरण केंद्र सुरू असले तरी उद्या ते बंद राहणार आहेत. त्यामुळे लस घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी तातडीने केंद्रात जाऊन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.