– पंडित दिनेश पंत
आज असलेल्या कार्तिकी एकादशीला देव उठणी प्रबोधिनी रमा एकादशी असेही म्हणतात. आषाढ शुक्ल एकादशी अर्थात देवशयन एकादशीला चातुर्मासा प्रारंभी निद्रेस गेलेले देव अर्थात भगवान विष्णू आज निद्रा पूर्ण करून आपल्या कार्यास परत येतात म्हणून आज देव उठणी एकादशी म्हटले जाते.
आजच्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी त्याचप्रमाणे श्री विष्णू भगवान कृष्ण भगवान शिव यांच्या पूजनास विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी प्रमाणेच कार्तिकी एकादशीला देखील मोठ्या संख्येने श्रीविठ्ठल भक्त वारकरी दिंड्या पताका सह मोठ्या संख्येने पंढरपूरला उपस्थित असतात. आज संपूर्ण दिवसभर एकादशी व्रत अर्थात उपवास केला जातो व उद्या उपवासाची सांगता केली जाते.
Today is Kartiki Ekadashi Importance