सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तुम्हाला तंबाखू खाण्याची सवय आहे? मग, हे वाचाच आहे

by Gautam Sancheti
मे 31, 2022 | 5:34 am
in इतर
0
tobacco e1653927974302

 

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक तंबाखू विरोधी दिन मंगळवार, ३१ मे रोजी जिल्हा रुग्णालयाच्यावतीने साजरा करण्यात येतो. यंदा जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक तंबाखू विरोधी दिन २०२२ चे घोषवाक्य (Theme) Tobacco a threat to our environment म्हणजेच “तंबाखू आपल्या वातावरणाला धोकादायक” दिले आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थाचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणामाबाबत समाजात जनजागृती व्हावी या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत तंबाखूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तीचे व्यसन सोडण्याकरीता तंबाखूमुक्ती समुपदेशन केंद्रामार्फत समुपदेशन केले जाते. तसेच तंबाखूमुक्ती करीता टोल फ्री क्रमांक १८००११२३५६ किंवा ०११-२२९०१००१ या क्रमांकावर मोफत समुपदेशन उपलब्ध असल्याचे कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वय सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. एम. मोतीपवळे सांगतात.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ३१ मे तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो, त्याचप्रमाणे याही वर्षी राज्यभरात जागतिक तंबाखू नकार दिन साजरा करण्याचे केंद्र शासनाने कळवले आहे. या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेची थिम “Tobacco Threat to our Environment ” ही आहे. तंबाखूजन्य पदार्थामुळे सभोवतालचे पर्यावरण व त्यामुळे मानवी जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांवर आधारित आहे, ही संकल्पना यामागे आहे.

भारतीय संविधानानुसार प्रदुषणमुक्त हवा हा सर्व नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. त्यानुसार जे व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतात, अशा व्यक्ती इतरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करण्यास कारणीभूत ठरतात. धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तीचे मुलभूत अधिकार बंधित करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार तंबाखूच्या सेवनामुळे आजतागायत ८.४० कोटी टन कार्बनडायऑक्साइट वातावरणात उत्सर्जित केला गेला. या बाबी जागतिक हवामान बदलाकडे आपणास घेऊन जात आहेत.

तंबाखूचा वापर प्रत्येक टप्यावर हानीकारक आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तंबाखूचे जीवनचक्र ही एक प्रचंड प्रदूषणकारी आणि हानीकारक प्रक्रिया आहे. धुम्रपानामुळे होणारे वायू प्रदूषण लक्षात येते. परंतु संपूर्ण पुरवठा साखळीत नुकसान होते. ते अधिक गुंतागुंतीचे असते. जगभरातील सुमारे ३.५ दशलक्ष हेक्टर जमीन दरवर्षी तंबाखू पिकवण्यासाठी नष्ट केली जाते जाते.

तंबाखूच्या वाढीमुळे दरवर्षी २०० हेक्टर जंगल तोड आणि मातीचा न्हास होतो. तंबाखूच्या उत्पादनामुळे पृथ्वीवरील पाणी, जीवाश्म इंधन आणि धातू संसाधने कमी होतात. तंबाखू पुरवठा साखळी आणि विक्रीचे जागतिकीकरण म्हणजे तंबाखू उद्योग मोठयाप्रमाणात संसाधन केंद्रित वाहतुकीच्या पद्धतीवर अवलंबून आहे. जगभरात दरवर्षी ४.५ ट्रिलियन सिगारेटच्या बटांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही, ज्यामुळे १.६९ अब्ज पौंड विपारी कचरा निर्माण होतो आणि हजारो रसायने हवा, पाणी आणि माती मध्ये मोडली जातात.

मजबूत धोरणे हवी ग्राहक पर्यावरणाबाबत अधिक जागरुक झाले आहेत आणि ते अधिक टिकाऊ उत्पादने निवडत आहेत. तंबाखू कॉर्पोरेशन्सनी इतरांसह पर्यावरणीय स्थिरता हा त्यांच्या कार्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) धोरणांचा अविभाज्य आधारस्तंभ बनवला आहे. आणि अनेक ग्रीन बॉशींग पद्धतीचा अवलंब केला आहे. यामध्ये समुद्र किनारा स्वच्छ करणे आणि नवीन उत्पादनांचे पर्यावरण पूरक म्हणून विपणन करणे यांचा समावेश आहे जेणेकरून लोकांचे लक्ष त्यांच्या स्वताच्या पर्यावरणास हानीकारक कृती पासून बळावे,

WHO २०२२ मोहीम सरकारे आणि धोरण निर्मात्यांना तंबाखूच्या टाकाऊ उत्पादनांच्या पर्यावरणीय आणि आर्थिक खर्चासाठी उत्पादकांना जबाबदार बनवण्यासाठी विमान योजनांची अंमलबजावणी आणि बळकटीकरण करण्यासह कायदे वाढवण्याचे आवाहन करते, तंबाखू नियंत्रणावरील फेम वर्क कन्व्हेन्शन नुसार, तंबाखूच्या जाहिराती, जाहिरात आणि प्रायोजकत्व जाहिरातींच्या CSR कार्यक्रमांसह तंबाखूच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्याची शिफारस WHO करते, सिगारेटचे बटस हे जागतिक स्तरावर सर्वात जास्त टाकून दिले जाणारे कचऱ्याचे तुकडे आहेत.

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोना या महामारी विरुद्ध लढा देत आहे. कोरोना व्यक्तीच्या मृत्यूस तंबाखचेही कारण आहे. लोकांमध्ये तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी आजपासूनच जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषवाक्याप्रमाणे तंबाखूमुक्ती करीता वचनबध्द व्हायचे आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी याकरीता समन्वय व सनियंत्रण समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे. ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वे (GATS-2) २०१६-१७ नुसार देशातील २८.०६ टक्के नागरिक तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. यामध्ये १०.०७ टक्के नागरिक (१९ टक्के पुरुष व २ टक्के स्त्रिया) धुम्रपान करतात. २१.०४ टक्के नागरिक (४२.०४ टक्के पुरुष १४.०२ टक्के स्त्रिया) धूररहीत तंबाखूचे सेवन करतात, महाराष्ट्रामध्ये २६ टक्के नागरिक तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात. यामध्ये ३.८ नागरिक (०६ टक्के पुरुष व ०१.४ टक्के स्त्रिया) धुम्रपान करतात. २६ टक्के नागरिक (३५ टक्के पुरुष व १७टक्के स्त्रिया) धुररहीत तंबाखूचे सेवन करतात.

लोबल अडल्ट टोबैको सर्वे (GATS-2) २०१६-१० नुसार महाराष्ट्रातील धुम्रपानाचे प्रमाण २.०८ टक्कयानी तर धुरविरहित तंबाखू सेवनाचे प्रमाण ३.२ टक्कानी कमी झालेले आहे. कुठल्याही प्रकारे तंबाखू वापराच्या प्रमाणात मागील सर्वेक्षणाच्या (GATS 1) तुलनेत ४.८ टक्क्यांनी लक्षणीयरित्या तंबाखू सेवन कमी झालेले असून ते प्रमाण ३१.४ टक्यावरून घटून २६.६ टक्के इतके खाली आलेले आहे. तथापी १५-१६ वयोगटातील व्यक्तींच्या तंबाखू वापराच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मागील सर्वेक्षणात २.९ टक्के असलेले प्रमाण ५.५ टक्के इतके वाढलेले आहे. ३० टक्के व्यक्ती घरामध्ये तसेच २३ टक्के व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी निष्क्रीय धुम्रपानाला बळी पडतात. ५५ टक्के धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती तसेच ५० टक्के धूररहित तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थ सोडण्याचा विचार अथवा नियोजन करतात.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची औरंगाबाद जिल्हयात फेब्रुवारी २०१३ पासून सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्परिणामची जाणीव व्हावी या करीता चित्रकला, निबंध, घोषवाक्य, कविता, रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या जातात. शाळेच्या १०० यार्ड परिसरात रस्त्यावर तंबाखू सेवन व खरेदी विक्री प्रतिबंधित क्षेत्र आशयाची पिवळी रेषा आखण्यात येते. पोलीस, शिक्षक, आरोग्य कर्मचारी व तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांसंबंधित भागीदाराकरीता तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत कार्यशाळा प्रशिक्षण, बैठका घेण्यात येतात. सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन कायदा २००३ ची यशस्वी अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकामार्फत पोलीस प्रशासन, अन्न औषधी प्रशासन व विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येते.

तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे प्राणघातक आजारांमधील आजार होतात. यामुळे दरवर्षी जगातील सुमारे ६० दशलक्ष लोकांचा अकाली मृत्यु होतो. भारतात दरवर्षी ८ ते १ लक्ष लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे होतो. सन २०१० च्या पाहणी अबालानुसार महाराष्ट्रातील सुमारे ३१.४ टक्के लोकांचा मृत्यू हा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. भारतात आढळणाऱ्या एकूण कर्करोग रुग्णांपैकी ३० टक्के कर्करोग हे तंबाखू सेवनामुळे होतात.

तोंडामध्ये ज्याठिकाणी तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थ ठेवले जातात त्या ठिकाणी पांढरा चट्टा, लाल चट्टा येतो, तोंड पूर्णपणे उघडत नाही, तोंडात फोड येतात. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, अन्ननलिका, श्वसन नलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, पोट, गर्भाशय इत्यादी अवयवांचा कर्करोग होतो. भूक मंदावते, पित्ताचा त्रास होतो, पोटाच्या आतड्यांमध्ये विकृती निर्माण होणे, श्वसननलिकेत किंवा पोटात व्रण होणे. धुम्रपानाचा संबंध श्वसनक्रियेशी आल्याने त्याचा दुष्परिणाम फुप्फुसावर होतो व श्वसनाचे विकार जडतात. हृदयरोग, पक्षाघात, हृदयाचा विकार रक्तदाब, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

क्षयरोग, मोतीबिंदू, नपुसंकता, गर्भपात, हाताच्या बोटांची शक्ती क्षीण होणे, गॅगरिन इ. आजार होतात. तंबाखू सेवनामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, उतार वयात अपंगत्व निर्माण होते. धूम्रपान करणाऱ्या गर्भवती स्त्रियांमध्ये कमी वजन असलेले अथवा असलेले बाळ जन्माला येते. महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन / धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये इतर सामान्य व्यक्तींपेक्षा कोविड १९ चा धोका जास्त आहे. धुम्रपान आपल्या फफ्फुसांना कमकुवत बनविते.

तंबाखूमुक्तीचे फायदे
१. दर २० मिनिटानंतर रक्तदाब नियमीत होतो, नाडी नियमीत होते, हाता व पायाचे तापमान नियमीत होते.
२.दर ८ तासानंतर रक्तातील कार्बन मोनाक्साईडचे प्रमाण कमी होऊन नियमित होते, रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण बाहुन नियमीत होते.
३. दर २४ तासानंतर हृदय झटका येण्याचा धोका कमी होतो.

४. जर ४८ तासानंतर चेतातंतूची बाढ पुर्ववत सुरु होते, गंध घेण्याची व आस्वादाची क्षमता वाढते.
५. नियमीत ते ३ महिने नंतर रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते, फुप्फुसाची कार्यक्षमता ३० टक्के वाढते.
६. दर १ ते ९ महिन्यानंतर खोकला, नाक चोंदणे कमी होते. थकवा व दम लागणे कमी होते, फुप्फुसे सामान्यपणे कार्य करू लागतात व त्यामुळे संसर्ग कमी प्रमाणात होतो.

७.१ वर्ष नंतर धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींपेक्षा हृदयरोग होण्याचा धोका अर्ध्याने कमी होतो.
८. ५ वर्ष नंतर धुम्रपान ५ ते १५ वर्ष बंद केल्यानंतर पक्षाघात होण्याचा धोका कमी होतो व धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीएवढाच राहतो.
९. १० वर्षानंतर फुफ्फुसाचा कर्करोग होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा अर्ध्याने कमी होते. तोंडाचा, घशाचा, अन्ननलिकेचा मूत्रपिंडाचा आणि स्वादूपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

तंबाखूचे सेवन बंद करण्यासाठी उपाय योजना
बऱ्याच व्यक्तींना तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थ सोडण्याची इच्छा असते. परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ती व्यक्ती तंबाखूच्या विळख्यात अडकुन राहते. त्याकरीता खालील उपाय योजना फायदेशीर ठरू शकतात.
१) तंबाखू सेवन बंद करण्याकरीता तारीख ठरवा व त्याची नोंद कैलेंडर वर करून ठेवा..
२) तुमच्या परिवारांना मित्रांना तंबाखू बंद करण्याच्या संकल्पाबाबत माहिती द्या
३) ठरविलेल्या दिवशीच सिगरेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन बंद करा.
४) तुमच्या जवळ असलेल्या सिगरेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ है नष्ट करा.

५) धुम्रपान व तंबाखूचे व्यसन असलेल्या व्यक्तीची संगत टाळा.
६) तंबाखू सेवनाची तलब टाळण्यासाठी स्वत:ला दुसऱ्या चांगल्या छंदामध्ये रमवा. पूर्वीच्या आनंदी क्षणांना आठवा, चांगल्या मित्रांची संगत करा, आपल्या कुटुंबाला वेळ द्या. भरपूर पाणी प्या, तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यावर तंबाखू ऐवजी इतर पौष्टीक अन्नपदार्थ जसे की शेंगदाने, बीट, गाजर, चणे, लवंग,विलायची, बडीशेप, मुळा, पेरु, केळी, इत्यादींचे सेवन करा.
७) जर तुम्ही वरील पध्दतीने तंबाखूचे व्यसन सोडण्यात यशस्वी होत नसल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तगडी ऑफर! Xiaomi, OnePlus सह या ५ स्मार्टफोनवर तब्बल २७ हजारांची सूट

Next Post

तिरुपतीत भाविकांची प्रचंड गर्दी; दर्शनासाठी ४८ तासांपेक्षा अधिक वेटिंग

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
Next Post
EfCLA GU0AEjsIg

तिरुपतीत भाविकांची प्रचंड गर्दी; दर्शनासाठी ४८ तासांपेक्षा अधिक वेटिंग

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011