विशेष प्रतिनिधी, नागपूर
आपल्याकडे वेगवेगळ्या हंगामात नानाविध फळे येतात, आणि बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने आपण ती खातो. विशेषत : आंबा, केळी, पपई, चिकू, पेरू, सिताफळ, द्राक्ष, मोसंबी, संत्री, टरबूज आदि फळे सर्वजण खातात. पण तुम्ही कधी लोकाट फळ खाल्ले आहे का? असे अनेक लोक असतील, ज्यांना या फळाबद्दल कदाचित माहिती नसेल, परंतु हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याला लुकाट किंवा लुकाथ असेही म्हणतात.
लोकाट आणि त्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी ते फायबर, नियासिन, थायमिन, फोलेट आणि फोलिक अॅसिड हे खनिजे असून ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात कॅल्शियम, लोह, मॅगनीज, पोटॅशियम, फॉस्फरस, जस्त, तांबे आणि सेलेनियम देखील असते. आता या फळांचे सेवन करण्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया …

लोकाट या फळाचे सेवन मधुमेहामध्ये फायदेशीर मानले जाते. मधुमेहाच्या रुग्णांना लोकाट चहा पिण्याचा सल्ला दिला जातो, कारण नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते.
तसेच सर्दी आणि श्वसनाच्या इतर समस्यांमध्ये लोकाटचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. लोकात चहा कफ अर्क औषध म्हणून देखील वापरला जातो. हा चहा श्वसनमार्गामधून विषारी पदार्थ काढून टाकते.
तसेच लोकाट फळांचे सेवन केल्यामुळे अनेक आजार उद्भवणाऱ्या घटकांपासून संरक्षण मिळते. याव्यतिरिक्त, लोकाट पानांमध्ये अॅसिड असते, ज्यामध्ये रोग प्रतिकारक अँटीव्हायरल एजंट्स असतात. लोकाट फळांचे सेवन केल्याने पचन संस्था निरोगी राहण्यास मदत होते. हे फळ बद्धकोष्ठता, अतिसार, पोटात गोळा येणे, सूज येणे किंवा पोट संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या दूर करते. त्याच वेळी, लोकाट पानांचा काढा पिण्यामुळे जुलाब आणि उलट्यांचा त्रास कमी होतो.