नाशिक – जग छोटं झालंय म्हणतात ते खोटं नाही. हजारो किलोमीटर लांब असलेले आपले परदेशातील बांधव देशाचे ॠण लक्षात ठेवतात, नाशिक पुण्यातील काही संस्था आणि समाजमाध्यमांवरील तरुण एकत्र येतात आणि या सह्रूदयतेच्या बळावर कोवीड काळात वैद्यकिय साहित्य आणि खाद्यतेलाची ट्रकभर मदत कश्मीरच्या बांधवांना पाठवले जाते यावर खरंतर विश्वास बसणं कठीण. पण नाशिकच्या सोशल नेटवर्कींग फोरमच्या माध्यमातून हे काम झालंय.
फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांचे सध्या कश्मीरला पोस्टींग असलेले मित्र कर्नल प्रणय पवार यांचा काही दिवसांपूर्वी मेसेज आला. सध्या ते मराठा बटालीयनचे इंचार्ज आहेत. त्यांच्या बटालीयनने कोवीडच्या संकटकाळात तिथल्या स्थानिकांसाठी मदतकार्य सुरू केले आहे. त्याअंतर्गत लोकसहभागातून एक कोवीड सेंटर ऊभे करणे आणि रोजगार नसलेल्यांना अन्नधान्य ऊपलब्ध करायचे ठरवले. कर्नल प्रणय यांनी या कार्यात सोशल नेटवर्कींग फोरम मदत करेल का म्हणून विचारले. सोबत आवश्यक वस्तूंची यादीही पाठवली.
आपले हे शुर जवान एका बाजूला देशाच्या सिमा सुरक्षीत ठेवून दूस-या बाजूला तिथल्या स्थानिक लोकांचीही काळजी घेत आहेत. अशावेळी त्यांच्या या कामात सोशल नेटवर्कींग फोरमने आपला खारीचा वाटा उचलायचे ठरवले आणि एसएनएफची टिम नेहमीप्रमाणे कामाला लागली.
यावेळी एक चांगली गोष्ट अशी झाली की परदेशातील एसयएनएफ सदस्य बांधवांचा कोविड मदतकार्यासाठी निधी जमा झालेला होता. यासाठी अमेरीकेहून चंद्रशेखर महाले, योगेश कासट, मस्कतहून राजेश बक्षी, विजय दुबे, दुबईहून निलेश चांडक, अबुधाबीहून माधव पाटणकर आणि आयर्लंडवरून शिरीष इंगवले यांच्या देणगी जमा झालेल्या होत्या. या निधीतून कश्मीरातील कोविड सेंटरसाठी गरजेचे असलेले ६० इंन्केब्यूटर्स मशीन्स त्वरीत घेण्यात आले. सदर ऊपक्रमाची माहिती रचना ट्रस्टचे डाॅ. हेमंत कोतवाल, डाॅ. आर्चीस नेरलीकर, नरेंद्र बर्वे आणि इतर पदाधीका-यांना यांनाही देण्यात आली. त्यांनीही त्वरीत तिथल्या स्थानिक रहीवाशांसाठी १००० किलो तेलाचे पॅकेट्स देण्याची तयारी दर्शवली. यासोबतच मराठा बटालीयनच्या कश्मीरी बांधवांच्या मदतीचे आवाहन पुण्यातील मराठा चेंबर ऑफ काॅमर्सचे प्रमुख सुधीर मेहता यांच्यापर्यंतही पोहोचले. त्यांनी त्वरीत प्रतिसाद देत एमसीसीच्या वतीने १० ऑक्सीजन काॅन्सन्ट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय साहित्य ऊपलब्ध करून दिले.
आता प्रश्न होता हे साहित्य कश्मीरला पाठवण्याचा. पण चांगल्या कामात कधीच अडथळे येत नाहीत याची याहीवेळा अनूभुती आली. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असलेल्या पुण्यातील संतोष कोडक यांनी कामानिमीत्त महाराष्ट्रात आलेला तिकडचा एक ट्रक शोधला आणि काम फत्ते झाले. कोडक यांनी पुण्यातील साहित्य भरून ट्रक नाशिकला एसएनएफच्या कार्यालयात पाठवला. इथले तेलाचे आणि इन्क्युबेटर्सचे बाॅक्सेस भरून ट्रक कश्मीरला रवानाही झाला.
या ऊपक्रमातील एक समान धागा म्हणजे औरंगाबादची सर्वीसेस प्रीपेरेटरी इनस्टीट्यूट ही संस्था. प्रमोद गायकवाड, कश्मीरला असलेले कर्नल प्रणय पवार आणि पुण्यात असलेले संतोष कोडक हे तीघंही या संस्थेचे माजी विद्यार्थी. सोशल मिडीयावर एकत्र आले आणि परदेशातील बांधवांच्या मदतीने नाशिक-पुणे ते कश्मिरी बांधवांपर्यंतच्या मदतकार्याची एक शृंखला पूर्णही झाली…
या प्रयत्नांना साथ देत परदेशात असूनही कोवीड काळात आपल्या देशबांधवांची काळजी करणा-या सर्व अनिवासी बांधव, रचना ट्रस्ट आणि इतर सहकार्यांचे मराठा बटालीयन आणि कुपवारा क्षेत्रातील बांधवांच्या वतीने आभार मानण्यात आले.