विशेष प्रतिनिधी, पुणे
आपण आवश्यक कामात व्यग्र असताना किंवा एखादा सिनेमा पाहत असताना कस्टमर केअर किंवा टेलिमार्केटिंग कंपन्यांकडून सतत फोन कॉल बहुतेक सर्वांनाच येतात. त्यामुळे सगळेच हैराण झालेले असतात. या अनावश्यक कॉल किंवा मेसेजना कसे ब्लॉक करावे हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होत असतो. याचे उत्तर आता या बातमीतून तुम्हाला मिळणार आहे. आज आम्ही तुम्हाला स्पॅम कॉल आणि मेसेजना ब्लॉक करण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात…
असे करावे ब्लॉक
आपल्या मोबाईलला ओपन करा. Recent Calls च्या पर्यायावर जाऊन ज्या क्रमांकाला तुम्ही स्पॅम मार्क करू इच्छिता संबंधित क्रमांकाला निवडा. त्यानंतर Block/report Spam पर्यायावर टॅप करावे. त्यानंतर स्पॅम क्रमांक ब्लॉक होईल. भविष्यात तुम्हाला त्या क्रमांकावरून कधीही कॉल येणार नाहीत.
दुसरा पर्याय
जिओ, एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियाच्या कोणत्याही नंबरवर येणार्या स्पॅम कॉलला अगदी सहजरित्या ब्लॉक करता येऊ शकते. स्पॅम कॉल ब्लॉक करण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यातील पहिला पर्याय म्हणजे एसएमएस आणि दुसरा म्हणजे कॉलिंग. तुम्हाला येणार्या अनावश्यक कॉलला ब्लॉक करायचे असेल तर आधी मेसेजिंग अॅपमध्ये जा. तिथे START ० टाइप करून १९०९ वर पाठवा. त्यानंतर आपल्या नंबरवर स्पॅम कॉल येणार नाहीत.
एक कॉल करून तुम्ही स्पॅम कॉल्सना ब्लॉक करू शकतात. त्यासाठी आपल्या फोनवरून १९०९ वर कॉल करावा. त्यानंतर दिल्या जाणार्या निर्देशांचे पालन करत डू नॉट डिस्टर्ब (डीएनडी) ला अॅक्टिव्ह करून घ्यावे.