इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो अतिशय ख्यातनाम आहे. या शोमधील प्रत्येक पात्र घरोघरी प्रसिद्ध आहे. राज अनडकट या शोमध्ये टप्पूची भूमिका साकारत आहे. बऱ्याच दिवसांपासून बातम्या येत होत्या की टप्पू म्हणजेच राज शो सोडणार आहे. याबाबत निर्माते किंवा राज यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. मात्र, आता खुद्द राज अनडकटनेच सोशल मिडियात पोस्ट टाकून शो सोडत असल्याचे सांगितले आहे.
राज बऱ्याच दिवसांपासून शोच्या शूटिंगसाठी येत नाहीये. अलीकडेच, शोला १४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक सेलिब्रेशन करण्यात आले ज्यामध्ये संपूर्ण टीम आली होती आणि त्यादरम्यान राज दिसला नाही ज्यानंतर त्याच्या जाण्याच्या बातम्या अधिक व्हायरल होऊ लागल्या. आता या बातम्यांवर राजला त्याची प्रतिक्रिया विचारली असता तो म्हणाला होता की, ‘माझे चाहते, माझे प्रेक्षक या सर्वांना माहित आहे की मी सस्पेन्स निर्माण करण्यात किती चांगला आहे. मी सस्पेन्स तयार करण्यात तज्ज्ञ आहे.
हा सस्पेन्स कधी संपणार असे राज याला विचारले असता तो म्हणाला की, ‘जेव्हाही ते घडेल तेव्हा मी माझ्या चाहत्यांना अपडेट करेन. योग्य वेळ आल्यावर सर्वांना कळेल. यानंतर राजला विचारले की, या बातम्यांमुळे तुला त्रास होतो का, तर तो म्हणाला की, नाही, या बातम्या त्याला अजिबात त्रास देत नाहीत आणि संयमाचे फळ गोड असते.
आता मात्र राजने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यात त्याने नमूद केले आहे की, त्याचा आणि तारक मेहताची प्रॉडक्शन कंपनी नीला फिल्म्स यांच्यातील करार संपुष्टात आला आहे. आपण सर्वांनी खुप प्रेम दिले. यापुढेही ते कायम राहिल. लवकरच मी आपल्याला भेटेन आणि पुढील अपडेट देईन.
Tarak Mehta Ka Oolta Chashma Tappu Exit
TMKOC TV Show Again one Actor Left Raj Anadkat