मुंबई – अनेक टीव्ही चॅनलवर विविध मालिका गाजत असतात. परंतु काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत जातात आणि त्या प्रचंड लोकप्रिय देखील होतात. त्यातीलच एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची होय. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका सुरू असून त्यामध्ये धमाल किस्से घडत असतात.
आता देखील असाच एक अगळा वेगळा कसा घडला, तो म्हणजे या मालिकेचे संपूर्ण टिम ही टीव्हीवरील केबीसी या लोकप्रिय शोच्या सेटवर धडकली. या शोचे होस्ट तथा अँकर बीग बी अमिताभ बच्चन यांना ही टिम बघून आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर शोमध्ये यासर्व कलाकारांनी खूप धमाल केली. विशेष म्हणजे गरबा देखील खेळला. आता संपूर्ण टिम लवकरच ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही शोच्या प्रत्यक्ष सेटवर दिसणार आहे. दि. १० डिसेंबरला प्रसारित होणार्या या भागाचा टीझर व्हिडिओ निर्मात्यांनी सोनी टीव्हीवर रिलीज केला आहे.
https://twitter.com/SonyTV/status/1468520213813424132?s=20
जेठालाल, टप्पू, सोडी आणि बबिता जी सारखी पात्रे साकारणारे सर्व कलाकार केबीसीच्या सेटवर पोहोचले तेव्हा संपूर्ण सेट प्रेक्षकांनी खचाखच भरला होता. केबीसीच्या सेटवर इतके कलाकार पाहून अमिताभ बच्चन आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की तुम्ही सर्व २१ जण आहात. मात्र, केबीसी मध्ये हॉटसीटवर बसलेले स्पर्धक जास्तीत जास्त २ जण असतात. आता अशा परिस्थितीत एवढ्या जणांसोबत हा खेळ कसा खेळायचा? असा प्रश्न पडला.
त्याचवेळी दिलीप जोशी यांनी क्षणाचाही विलंब न लावता अमिताभ बच्चन यांना सांगितले, ‘आता तुम्ही काय करा, दोन जण तेथे हॉट सीटवर बसतील. बाकी, आम्ही त्यांची उत्तरे तपासून पाहू. आणि त्यांना योग्य उत्तर सांगू! दिलीप जोशींचे म्हणणे ऐकून अमिताभ बच्चन कपाळाला हात लावून म्हणाले, ‘ओह माय गॉड’. दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये पत्रकार पोपटलालची भूमिका साकारणारा अभिनेता श्याम पाठक यानेही आपली समस्या बच्चन यांच्या समोर मांडली.
https://twitter.com/SonyTV/status/1468535834899013637?s=20
पोपटलाल यांनी अमिताभ बच्चन यांच्या चरणांना स्पर्श केला म्हणजेच पाया पडून सांगितले की, त्यांनी माझे लग्न करण्यास मदत करावी, म्हणजे मला वधू मिळवून द्यावी, कारण मी सर्व घरकाम करू शकतो, मी घरी पीठ चांगले मळून देतो आणि लॉकडाउनमध्ये मी झाडूने घराची चांगली सफाई करण्याचे शिकलो आहे. विशेष म्हणजे शोची संपूर्ण स्टार कास्ट या सेटवर गरबा करताना दिसली. या एपिसोडमध्ये नक्कीच खूप मजा येणार आहे. आता चाहत्यांनाही या शो ची खूप उत्सुकता लागली आहे.
https://twitter.com/SonyTV/status/1468542570124877824?s=20