मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली असून अनेक घरांमध्ये ही मालिका नेहमीच बघितली जाते. कारण या मधील जवळपास प्रत्येक पात्र स्वतःच खास आहे. या शोमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील जेठालालची भूमिका करणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी तर या व्यक्तिरेखेला चार चाँद लावले आहेत.
खरे म्हणजे या भूमिकेसाठी दिलीप जोशी हे काही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती हे फार कमी जणांना माहीत आहे. वास्तविक दिलीपच्या आधी, निर्मात्यांनी एकूण 5 कलाकारांना ही भूमिका ऑफर केली होती, परंतु या सर्वांनी जेठालालची भूमिका नाकारली. आता जाणून घेऊ या कोण आहेत हे कलाकार?
योगेश त्रिपाठी
‘भाबीजी घर पर हैं’ आणि ‘हप्पू की उल्टान पलटन’ या कॉमेडी शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या योगेश त्रिपाठीला कोण ओळखत नाही? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी जेठालालच्या भूमिकेसाठी योगेशशी संपर्क साधला होता. एकाच वेळी अनेक प्रकल्प हाती घ्यायचे नसल्याने योगेशने ही भूमिका करण्यास नकार दिला.
किकू शारदा
किकू शारदा ‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून खूप धमाल करत आहे. किकूलाही जेठालालच्या भूमिकेची ऑफर मिळाली आहे. मात्र स्टँड-अप कॉमेडियनच्या भूमिकेत खूश असल्याने किकूने शोची ऑफर नाकारली होती.
एहसान कुरेशी
एहसान कुरेशी हा देखील एक स्टँड-अप कॉमेडियन आहे आणि त्याच्याशी देखील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी संपर्क साधला होता. परंतु एहसानने जेठालालची भूमिका का नाकारली? ही बाब आजपर्यंत स्पष्ट झालेली नाही.
अली असगर
‘कहानी घर घर की’ आणि ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्ये दिसलेल्या अली असगरलाही खूप मागणी आहे. जेठालालच्या भूमिकेसाठी अली असगरलाही अप्रोच करण्यात आले होते. अली असगरनेही त्याच्या जुन्या व्यावसायिक बांधिलकीमुळे ही भूमिका नाकारली.
राजपाल यादव
राजपाल यादव बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपली उपस्थिती वाढवत आहे. राजपाललाही जेठालाल बनण्याची संधी मिळाली, पण त्याने ही भूमिका नाकारली. कारण राजपालला फक्त त्याच्या बॉलिवूड करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
दरम्यान, या 5 कलाकारांनंतर अखेर निर्माते दिलीप जोशींकडे या भूमिकेची ऑफर घेऊन गेले. दिलीप जोशी यांनी घाईघाईने ही मालिका करायला होकार दिला. गेली अनेक वर्षं दिलीप जोशींना जेठालाल मुळे आनंद मिळतोय आणि प्रेक्षकांनाही ही भूमिका आवडते की या भूमिकेत दुसऱ्या कोणाची तरी कल्पना करणे अवघड नसून अशक्य आहे.