मुंबई – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय असल्याने या या मालिकेतील कलाकार नेहमीच चर्चेत असतात. कारण आता प्रेक्षकांचे खुपच आवडते झालेले आहेत. या मालिकेत राज अनादकट हा टप्पूची भूमिका साकारत आहे. तर मुनमुन दत्ता या शोमध्ये बबिताची भूमिका साकारत आहे. त्यांच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मात्र दोघांनीही त्यांच्या अफेअरला अजून दुजोरा दिलेला नाही. तरीही यावरून दोघांना ट्रोलही करण्यात आले. आता टप्पूचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वास्तविक, या दोघांनीही आपले नाते उघडपणे स्वीकारलेले नाही. असे असूनही, दोघेही अनेक प्रसंगी एकत्र दिसले आहेत. यासाठी त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले. आता राज अनादकटचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.
यामध्ये राज अनादकट हा व्हिडीओ बनवताना दिसत आहे. यामध्ये तो लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारत आहे. यावर या राज अनादकटचा चेहरा पाहण्यासारखा आहे. राज अनादकटने ‘आजा सनम मधुर चांदनी में हम’ या गाण्याची धूनही सोबत ठेवली आहे.
राज अनादकटचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यात अनेक जण त्यावर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘बबिता जी, ३० मिनिटांत तुमची वाट पाहत आहे’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘बबिताजी येत आहे.’ तर तिसऱ्याने लिहिले आहे की, ‘बबिता जी या’ तर चौथ्याने लिहिले आहे, ‘बबिता जी वाट पाहत आहे.’ या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाख ३० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
https://www.instagram.com/p/CTt2rmXNHdn/?utm_source=ig_web_copy_link
टप्पू आणि बबिताच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दोघांनीही त्यांच्या अफेअरला अजून दुजोरा दिलेला नाही. वास्तविक मुनमुन दत्ता आणि राज अनादकट यांच्या वयात खूप अंतर आहे. या ट्रोल होण्यावर मुनमुन दत्तानेही ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.