इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची ओळख आहे. मध्यंतरी या मालिकेतून अनेकांनी एक्झिट घेतली. आता पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे. या मालिकेत तारक मेहता ही भूमिका साकरणारे शैलेश लोढा यांच्या इन्स्टा पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम आपले वेगळेपण जपत प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे. या शोचे लाखो चाहते आहेत. त्यामुळेच यातील पात्र दर्शकांना आपलेसे वाटतात.
या कार्यक्रमात दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीने काही वर्षांपूर्वी अचानक शो सोडला. प्रेग्नन्सी लिव्हनंतर ती पुन्हा शोमध्ये परतेल अशी प्रेक्षकांना आशा होती मात्र ती अद्याप परतलेली नाही. दिशा वकानी शोमध्ये परतणार अशा चर्चा अनेकदा रंगल्या. पण आता ती शोमध्ये कधीच परतणार नसल्याच्या चर्चा होत आहेत. आणि या चर्चांसाठी कारण ठरते आहे ती पूर्वी या शोमध्ये तारक मेहता ही भूमिका साकरणारे शैलेश लोढा यांची एक पोस्ट. दरम्यान, मानधनाच्या मुद्द्यावरून निर्मात्यांशी वाद झाल्याने दिशाने शोमध्ये परतण्यास नकार दिल्याचंही बोललं जात.
शैलेश लोढा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी एका शायरीचा उल्लेख केला आहे. आपल्या पोस्टमध्ये शैलेश लोढा म्हणतात, “औरों के हक़ का जोड़ा सब उसने, किसी के मन से जुड़ कर नहीं देखा, इस बात से ही फितरत पता चलती है उसकी जिसने भी उसे छोड़ा, मुड़ कर नहीं देखा ।” शैलेश लोढा यांच्या शायरीतील शेवटची ओळ खूपच काही बोलून जात असल्याचा दावा चाहत्यांनी केला आहे.
कार्यक्रमाच्या नियमित प्रेक्षकांच्या मते शैलेश लोढा यांनी असित मोदी यांच्यासाठी ही शायरी लिहिली असल्याचे म्हणत आहेत. शैलेश लोढा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही किंवा थेट काही वक्तव्य केलेलं नाही. पण दिशा वकानी शोमध्ये कधीच परतणार नाही असाच या शायरीचा इशारा असल्याचं मानलं जात आहे.
ही ओळ असित मोदी यांच्यासाठी आहे, अशी चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे. मागच्या काही महिन्यामध्ये ‘तारक मेहता’च्या अनेक कलाकारांनी शो सोडला आहे. ज्यांनी हा शो सोडला आहे त्यातील कोणीच परत आलेलं नाही. खुद्द शैलेश लोढा यांनीही काही महिन्यांपूर्वीच हा शो सोडला असून त्यांच्या जागी सचिन श्रॉफ यांना कास्ट करण्यात आलं आहे. शैलेश यांच्या या पोस्टनंतर, आता दिशा वकानी शोमध्ये कधीच परतणार नाही असा अंदाज चाहते लावताना दिसत आहेत.
दिशा वकानी तीन वर्षांपासून या शोमध्ये दिसलेली नाही. प्रेग्नन्सी लिव्हवर गेलेली दिशा वकानी शोमध्ये कधी परतणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण आता दिशा वकानी दोन मुलांची आई झाली आहे. चाहते मात्र आजही दिशा शोमध्ये परतण्याची वाट पाहत आहेत.
TMKOC Shailesh Lodha Post Daya Ben
Entertainment TV Show








