इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असतो. या मालिकांमधील पात्र, व्यक्तिरेखा या त्यांना जवळच्या वाटतात. म्हणूनच या मालिकांमधील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील घटना देखील त्यांना जवळच्या वाटतात. छोट्या पडद्यावरील अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’.
गेली अनेक वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करते आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठं आहे. याच मालिकेतील एक सुप्रसिद्ध कलाकार पुढल्या वर्षी बोहल्यावर चढणार आहे. अभिनेता तनुज महाशब्दे लवकरच लग्न करणार आहे. वयाच्या ४२व्या वर्षी तनुजने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतील अय्यर हे पात्र साकारणारा तनुज अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. बबिता आणि अय्यरची जोडी या मालिकेत आणि प्रेक्षकांच्या मनातही सुपरहिट जोडी ठरली. पण खऱ्या आयुष्यात मात्र तनुज अजूनही अविवाहित आहे. लवकरच तो लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, पुढच्या वर्षी म्हणजे २०२३मध्ये तनुज लग्न करणार आहे. त्याची पत्नी कोण असेल, याची काही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मध्यंतरी त्याचं नाव बबिता हे पात्र साकारणाऱ्या मुनमुन दत्तासोबत जोडलं गेलं. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा बऱ्याच रंगल्या. पण मध्यंतरी दिलेल्या मुलाखतींमध्ये दोघांनी रिलेशनशिपच्या चर्चा खोट्या असल्याचं म्हटलं होतं. तनुजनेही त्याच्या लग्नाच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं होतं. तर दुसरीकडे, तनुजची होणारी पत्नी मुनमुनपेक्षाही सुंदर असल्याची चर्चा आहे. आता पुन्हा एकदा तनुजच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
TMKOC Krushnan Ayyar Tanuj Mahashabde Wedding
Tarak Mehta ka Ooltah Chashma Entertainment TV Show Comedy